विराट अनुष्काच्या कोरोनाविरोधी अभियानाला लोकांची साथ, 24 तासांत जमली बक्कळ रक्कम!
विराट अनुष्काने 'केट्टो'च्या मदतीने पुकारलेल्या अभियानाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. पाठीमागच्या केवळ 24 तासांत 3.6 कोटी रुपयांची मदत लोकांनी केली आहे. (Virat Kohli and Anushka Sharma campaign with Ketto to raise 3.6 Crore funds only 24 hours Covid-19 relief)
मुंबई : संपूर्ण भारत देश कोरोनाशी (India Covid 19) दोन हात करतोय. कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या कठीण प्रसंगी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करतायत. आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या जोडीने कोरोना लढ्यात ताकदीने सहभाग घेतला. स्वत: 2 कोटींची मदत जाहीर केल्यानंतर आता केट्टो या संंस्थेसोबत विराट अनुष्का एक अभियान राबवत आहे. या अभियानाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. पाठीमागच्या केवळ 24 तासांत 3.6 कोटी रुपयांची मदत लोकांनी केली आहे. (Virat Kohli and Anushka Sharma campaign with Ketto to raise 3.6 Crore funds only 24 hours Covid-19 relief)
केवळ 24 तासांत 3.6 कोटी रुपये निधी
क्राऊड फंडिंग अँड मेडिकल फंड रेसिंग इन इंडिया अर्थात केट्टोसोबत विराट-अनुष्का जोडी #InThisTogether या मोहिमेद्वारे कोरोनाविरोधी लढ्यासाठी निधी गोळा करत आहे. याच अभियानाअंतर्गत पाठीमागच्या केवळ 24 तासांत 3.6 कोटी रुपयांची मदत लोकांनी केली आहे, अशी माहिती विराट कोहलीने ट्विटद्वारे दिली आहे.
लोकांच्या प्रतिसादाबद्दल मी खूप आनंदी
“पाठीमागच्या 24 तासांत साडे तीन कोटींपेक्षा अधिक निधी जमा झालाय. लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आनंदी आहे. आमचं उदिष्ट पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावं लागणार आहे. लोकांनी सढळ हाताने मदत करावी, धन्यवाद…!”, असं विराट कोहलीने म्हटलंय.
3.6 crores in less than 24 hours! Overwhelmed with the response. Let’s keep fighting to meet our target and help the country. Thank you.?#InThisTogether #ActNow #OxygenForEveryone #TogetherWeCan #SocialForGood@ketto @actgrants pic.twitter.com/ZCyAlrgOXj
— Virat Kohli (@imVkohli) May 8, 2021
पहिल्यांदा स्वत: मदत केली, मग लोकांकडे मदत मागितली
कोरोनाविरोधी लढ्यात विराट अनुष्काने केवळ लोकांकडे मदतच मागितली नाही तर अगोदर त्यांनी भरघोस हाताने मदतंही केलीय. दोन कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा विराट-अनुष्काने केली आहे.
विराट अनुष्काचं मदतीचं आवाहन
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतो आहे. देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे, तिच्यासमोर काही आव्हानं आहेत. ज्या परिस्थितीतून लोक जात आहे ते पाहून वाईट वाटतंय, आपल्या मदतीची लोकांना गरज आहे, असं म्हणत विराट-अनुष्काने लोकांना मदतीचं आवाहन केल होतं.
View this post on Instagram
(Virat Kohli and Anushka Sharma campaign with Ketto to raise 3.6 Crore funds only 24 hours Covid-19 relief)
हे ही वाचा :
मायदेशी जाण्याची लगबग सुरु होती, पण आता भारतातच मुक्काम, न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण!
Video : क्रिकेटमधला पहिला ओरिजनल मॅच फिनिशर, त्याच्या खास स्टाईलमध्ये संपवायचा मॅच!