Virat Kohli | विराटकडून अनुष्कामुळे माघार? नेटकऱ्यांनी हेरलं अचूक कारण!
Virat Kohli And Anushka Sharma | विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यातून माघार घेतल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. कुणी आपल्या अंदाजाने कुणी काही फोटोंच्या माध्यमातून अंदाज बांधले आहेत.
मुंबई | टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली याने पहिल्या 2 कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विराट कोहली याने 2 सामन्यातून बाहेर पडण्यामागचं कारण हे वैयक्तिक असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. तसेच बीसीसीआयने विराटने कोणत्या कारणासाठी माघार घेतली, याचा कयास बांधण्याचा प्रयत्न करु नये. तसेच विराटच्या गोपनियतेचा मान राखवा, असं म्हटलंय. मात्र त्यानंतरही नेटकरी आपला अंदाज बांधण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गरोदर आहे. ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याने विराटने 2 सामन्यातून माघार घेतली आहे, असा दावा सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अनु्ष्का शर्मा गरोदर असल्याने विराट कोहली हा अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी न गेल्याचंही म्हटलं जात आहे. एका बाजूने अनुष्का गरोदर असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला काहीही कारण असो, विराटच्या गोपनियतेचा मान राखायला हवा, असंही नेटकरी म्हणत आहेत.
आता विराटऐवजी कोण?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे. त्यात विराटने माघार घेतली आहे. त्यामळे टीममध्ये विराटच्या जागी कुणाला संधी मिळणार, याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे. विराटच्या जागी बदली खेळाडूची लवकरच घोषणा करणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
विराटची माघार आणि नेटकऱ्यांचा अंदाज
If Anushka is pregnant and this is the reason Virat Kohli didn’t attend Ram Mandir inauguration then we should not troll him. Respect privacy.
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) January 22, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.