World Cup स्पर्धेच्या तिकीटांसाठी झुंबड! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केलं असं काही..

World Cup : वनडे वर्ल्डकप स्पर्धा म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच. क्रिकेटचा महाकुंभ यंदा भारतात असल्याने तिकिटांसाठी तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रिकेटपटूही हैराण झाले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं की..

World Cup स्पर्धेच्या तिकीटांसाठी झुंबड! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केलं असं काही..
World Cup स्पर्धेची तिकीटं मिळवण्यासाठी मारामार! विराट आणि अनुष्काने सरळ स्पष्टच सांगितलं की...
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 3:11 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप सोहळा आता दिवसांवरून काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे क्रिकेटचा प्रत्येक्ष याची डोळा याची देहि पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची धडपड सुरु आहे. तिकिट मिळवण्यासाठी काय वाटेल ते करण्याची तयारी सुरु झाली आहे. वर्ल्डकप तिकीटांसाठी होत असलेली मागणी पाहता क्रिकेटपटूही हैराण झाले आहेत. संपूर्ण स्थिती पाहता विराट कोहली यानेही हात जोडले आहे. विराट कोहली याने आपले मित्र आणि नातेवाईकांना सोशल मीडियावर थेट संदेश दिला आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठीची कोणतीही तिकीटं मागू नका असं आवाहन त्याने या माध्यमातून केलं आहे. विराट कोहलीसह पत्नी अनुष्कानेही तिकीटांसाठी संपर्क साधू नका असं स्पष्ट सांगितलं आहे.

काय म्हणाले विराट आणि अनुष्का?

विराट कोहली याने इंस्टास्टोरीवर एक मेसेज दिला आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, “आम्ही वर्ल्डकप खेळायला जात आहोत. त्यामुळे मी माझ्या सर्व मित्रांनी विनंती करतो की माझ्याकडे तिकीट मागू नका. तुम्हीच घरूनच सामन्याचा आनंद लुटा.” विराट कोहलीच्या या विनंतीनंतर अनुष्कानेही यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. विराट कोहलीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की, ‘यात मी आणखी एक बाब जोडत आहे. जर कोणाला मेसेजचं उत्तर मिळालं नाही तर माझ्याकडून मदत मागू नये. समजून घ्याल धन्यवाद.’

एका तिकीटाची किंमत 40 हजार रुपये

भारतात विश्वकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामा 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हा सामना खेळला जाईल. यासाठी दोन्ही संघ चेन्नईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे, वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिकीटांची विक्री सुरु झाली आहे. सामन्याचं तिकीट 499 रुपयांपासून 40 हजारापर्यंत आहे. इतर देशांसाठीचं तिकीट 29 हजाराला विकलं जात आहे. भारत पाकिस्तान सामना आणि अंतिम फेरीचे तिकीटांची विक्री झाली आहे.

वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.