कोहली बाबर आझमच्या ‘एक पाऊल पुढे’, पाकिस्तानच्या दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने
विराट-बाबर दोघांचाही खेळ मस्त आहे. दोघांच्याही खेळण्याची एक वेगळी पद्धत आहे. परंतु कोहली बाबर आझमच्या एक पाऊल पुढे आहे, असं मत मोहम्मद युसूफने मांडलं. (Virat Kohli And Babar Azam Who is Best Mohammad yousuf big Statement)
मुंबई : जागतिक क्रिकेटमधील सध्याच्या घडीचा सर्वोत्तम खेळाडू कोण? असा प्रश्न ज्या ज्या वेळी उपस्थित होतो त्या त्या वेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव अग्रभागी येतं. पण गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमने (Babar Azam) आपल्या खेळाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. विराटचे विक्रम मोडून काढण्याचा जणू त्याने चंग बांधलाय. आझमने नुकताच विराटचा टी ट्वेन्टी इंटनॅशनल क्रिकेटमध्ये वेगवान 2000 रन्स करण्याचा विक्रम मोडित काढला. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद युसूफला (Mohammad yousuf) ज्यावेळी विराट की बाबर असा प्रश्न विचारला त्यावेळी त्याने विराटच्या खेळीचं कौतुक केलं. (Virat Kohli And Babar Azam Who is Best Mohammad yousuf big Statement)
विराट-बाबरमध्ये बेस्ट कोण?
विराट कोहली आणि बाबर आझममध्ये नेहमीच तुलना केली जाते. या दोन खेळाडूंमध्ये सर्वोत्तम खेळाडू कोण, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. हाच प्रश्न पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफला विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, विराट-बाबर दोघांचाही खेळ मस्त आहे. दोघांच्याही खेळण्याची एक वेगळी पद्धत आहे. परंतु कोहली बाबर आझमच्या एक पाऊल पुढे आहे, असं मत मोहम्मद युसूफने मांडलं.
एका युट्यूब चॅनेलशी बोलताना मोहम्मद युसूफ म्हणाला, “मी कोहलीला सराव करताना पाहिलं नाही. पण मी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेत. जर आजच्या जमान्यात मॉडर्न क्रिकेट म्हणजे काय असतं असं जर मला कुणी विचारलं तर मी फिटनेस असं सांगेन… आजकाल क्रिकेटमध्ये फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फिटनेसशिवाय क्रिकेटर चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाही”
मोहम्मद युसूफकडून कोहलीची तोंडभरुन स्तुती
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर 70 शतकं आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 12 हजार रन्स आहेत तर टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 10 हजारांहून अधिक रन्स केलेत. टी ट्वेन्टीमध्ये देखील त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने रेकॉर्डचा डोंगर बनवलाय, असं युसूफ म्हणाला.
(Virat Kohli And Babar Azam Who is Best Mohammad yousuf big Statement)
हे ही वाचा :
Video : दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन, जोफ्रा आर्चरचा डोकं फोडणारा बाऊन्सर, बॅट्समन थोडक्यात वाचला!