कोहली आणि नवीन उल हकची गट्टी जमली! पण गौतम गंभीरने रोखठोक भूमिका मांडत सांगितलं की…

आयपीएल 2023 स्पर्धा विराट कोहली आणि नवीन उल हक वादाने चांगलीच गाजली. या भांडणात तेव्हाचा लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर यानेही उडी घेतली होती. त्यामुळे हा वाद चांगलाच चिघळला होता. पण आता विराट आणि नवीनची गट्टी जमली आहे. पण गौतम गंभीरने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

कोहली आणि नवीन उल हकची गट्टी जमली! पण गौतम गंभीरने रोखठोक भूमिका मांडत सांगितलं की...
कोहली आणि नवीन उल हक वादावर गौतम गंभीरने अखेर तोंड उघडलं, स्पष्टच म्हणाला की; जर कोणी...
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 8:05 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद कोणीच विसरू शकत नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर यानेही उडी घेतली होती. वादाने गंभीर रूप धारण केल्यानंतर बऱ्याच तू तू मै मै नंतर प्रकरण शांत झालं. पण यानंतर सोशल मीडियावर हा वाद सुरुच असल्याचं पाहिलं गेलं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत हा वाद खऱ्या अर्थाने संपुष्टात आला. विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी वादावर पडदा टाकत काहीच झालंच नाही असं सांगितलं. आता हा वाद मिटल्यानंतर गौतम गंभीरने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गौतम गंभीरने एएनआय पॉडकास्टवर बोलताना आपली भूमिका मांडली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर म्हणून भूमिका बजावलेल्या गौतम गंभीर याने वादावर बोलताना सांगितलं की, “हे माझं काम होतं की मी माझ्या खेळाडूच्या बचावासाठी यावं. माझ्या खेळाडूसोबत कोणतरी चुकीचं वागावं याचा अधिकार मी त्याला देणार नाही. एक मेंटॉर म्हणून माझं कर्तव्य आहे की, खेळाडूचा बचाव करावा आणि प्रत्येक वाईट गोष्टींपासून दूर करावं.”

“एक मेंटॉर म्हणून तसा विचार करणं थोडं वेगळं आहे. पण माझ्या खेळाडूंसोबत कोणी वाईट वागत असेल तर मी ते बघू शकत नाही. जर मैदानात सामना सुरु असताना काही घडलं तर मी तिथे काहीच करू शकत नाही. पण सामना संपल्यानंतर कोणी माझ्या खेळाडूसोबत तसं वागत असेल तर मी त्या खेळाडूच्या बचावासाठी उभा राहीन. हा माझा अधिकार आहे.”, असं गौतम गंभीरने स्पष्टपणे सांगितलं.

विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद आता संपुष्टात आला आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामन्यात या दोघांनी हातमिळवणी केली. त्यामुळे आता सर्वकाही ठिक झालं आहे असंच म्हणावं लागेल. आयपीएल 2023 मध्ये गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. आता गंभीरने कोलकात्या नाईट रायडर्ससोबत हातमिळवणी केली आहे. गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये जेतेपद जिंकलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.