
इंदूर | टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 173 धावांचं आव्हान हे टीम इंडियाने 15.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल ही मुंबईकर जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. यशस्वीने सर्वाधिक 68 धावा केल्या. तर शिवमने नाबाद 63 धावांचं योगदान दिलं.
यशस्वी-शिवम व्यतिरिक्त 14 महिन्यांनी टीममध्ये पुन्हा परतलेल्या विराट कोहली याने 29 धावांचं योगदान दिलं. विराटने या 29 धावांसह मोठा रेकॉर्ड केला आहे. विराटने 181.25 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. विराटने या 29 धावांच्या मदतीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहली याने टी 20 क्रिकेटमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. विराटच्या नावावर आतापर्यंत विजयी धावांचा पाठलाग करताना 2 हजार 12 धावा आहेत. तसेच विराट टी 20, वनडे आणि टेस्टमध्ये चेज करताना प्रत्येकी 2 हजार धावा करणारा क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज ठरला आहे.
दरम्यान टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेजिंग करताना सर्वाधिक धावांचा विक्रम हा आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याच्या नावावर आहे. पॉलने आतापर्यंत 2 हजार 74 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा, टीम इंडिया, 1 हजार 465 धावा.
बाबर आझम, पाकिस्तान, 1 हजार 628 धावा.
डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया, 1 हजार 788 धावा.
विराट कोहली, टीम इंडिया, 2 हजार धावा.
पॉल स्टर्लिंग, आयर्लंड, 2 हजार 74 धावा.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.