IND vs BAN: विराट कोहली वर्ल्ड कपचा बादशाह, क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच
Virat Kohli IND vs BAN: विराट कोहलीने बांगलादेश विरुद्ध 37 धावांची खेळी केली. विराटने यासह महारेकॉर्ड केला आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 47 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. हा सामना सर व्हीव्हीयन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिगा येथे खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. विराट कोहली याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह शानदार बॅटिंग करत चांगली सुरुवात करुन दिली. विराटने या खेळी दरम्यान इतिहास रचला आहे. विराट कोहलीने असा कारनामा केलाय, जो अद्याप कुणालाही वनडे किंवा टी 20 अशा कोणत्याही वर्ल्ड कप स्पर्धेत जमलेला नाही.
विराट कोहलीने बांगलादेश विरुद्ध 28 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीत 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. विराटने या खेळीसह टी 20 आणि वनडे अशा दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेत मिळून एकूण 3 हजार धावांचा टप्पा पार केला. विराट अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा (टी 20+वनडे)
विराट कोहली – 3 हजार 2 धावा. रोहित शर्मा – 2 हजार 637 धावा. डेव्हिड वॉर्नर – 2 हजार 502 धावा. सचिन तेंडुलकर – 2 हजार 278 धावा. कुमार संगकारा – 2 हजार 193 धावा. शाकिब अल हसन – 2 हजार 174 धावा. ख्रिस गेल – 2 हजार 151.
दरम्यान टीम इंडियाच्या सर्वच फलंदाजांनी शानदार बॅटिंग केली, त्यामुळे 190 पार पोहचण्यात मदत झाली. हार्दिकने 27 बॉलमध्ये नाबाद 50 धावांची खेळी केली. हार्दिकने या दरम्यान 4 चौकार आणि 3 सिक्स ठोकले. तर पंतने 24 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली. शिवम दुबेने 24 बॉलमध्ये 34 धावा जोडल्या. तर कॅप्टन रोहित शर्माने 11 चेंडूत 23 धावांचं योगदान दिलं.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, शाकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेंदी हसन, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि आणि जसप्रीत बुमराह.