IND vs SA : आफ्रिकेचा पराभव निश्चित, विराटच्या बर्थ डे दिवशीच्या सामन्यांचे निकाल पाहाच
IND vs SA : वर्ल्ड कपमधील दोन बाहुबली संघ आज एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याआधी एक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये कोहलीच्या बर्थ डे दिवशी भारत अपराजित राहिलेला आहे. यामध्ये एक वर्ल्ड कप सामन्याचाही समावेश आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आज एकमेकांना भिडत आहेत. आजचा सामनाच नाहीतर दिवसही खास आहे कारण विराट कोहलीचा वाढदिवस आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना पार पडणार आहे. भारत आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवणार हे नक्की आहे. कारण आज तसाच काहीसा आजही जुळून येऊ शकतो.मागील काही विराट कोहलीच्या वाढदिवसादिवशी भारतीय संघाचा पराभव झालेला नाही.
विराट कोहलीने 2015 मध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. हा सामना मोहालीमध्ये 5 नोव्हेंबरला झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने 108 धावांनी विजय मिळवला होता. विराट या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नव्हता, पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 29 धावांवर आऊट झाला होता. मात्र सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला होता. विराटच्या नेतृत्त्वात भारताचा पहिलाच सामना होता.
विराट कोहलीच्या वाढदिवशी, 2021 च्या T20 विश्वचषकात भारताने स्कॉटलंडविरुद्ध दुसरा सामना खेळला. 20 षटकांत 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने येथेही 81 चेंडूत 8 विकेट्स राखून मोठा विजय नोंदवला. या सामन्यात विराट 2 धावा करून नाबाद राहिलेला. आजच्याही सामन्यात असाच निकाल लागावा अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र आफ्रिका संघाचं आव्हान काही सोप नसणार आहे.
दरम्यान, भारताने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. बर्थ डे बॉय रोहित आज किती धावा करतो याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.
(प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज