Ind va Aus ODi : विराट कोहली याने नाटू नाटू गाण्यावर भर सामन्यात धरला ठेका, पाहा व्हिडीओ

विराट कोहली फिल्डिंग करताना कोहलीने ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या नाटू नाटू गाण्यावर भर मैदानात त्याने ठेका धरलेला पाहायला मिळाला.

Ind va Aus ODi : विराट कोहली याने नाटू नाटू गाण्यावर भर सामन्यात धरला ठेका, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 7:13 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला एकदिवसीय सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 188 धावांवर आटोपला. भारतीय वेगवान माऱ्यासमोर कांगारूंच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक 3 विकेट्स कांगारूंना गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आजच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या कर्णधार असला तरी कोहली नेतृत्त्व करताना दिसला. इतकंच नाहीतर फिल्डिंग करताना कोहलीने ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या नाटू नाटू गाण्यावर भर मैदानात त्याने ठेका धरलेला पाहायला मिळाला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना ट्रेव्हिस हेड आणि मिशेल मार्श मैदानात उतरले होते. त्यावेळी भारतीय संघ मैदानात फिल्डिंगला आला होता, त्यावेळी विराट कोहली मैदानावर स्लीपला उभा असलेला दिसून आला. उभा असताना त्याने ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या नाटू नाटू गाण्याच्या स्टेप्स त्याने केल्या. कोहलीचा हा डान्स पाहून चाहते खूश झाले. चाहत्यांचे म्हणणे आहे की कोहलीने परफेक्ट स्टेप्स केल्या आहेत. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच पहिला झटका दिला. ट्रॅव्हिस हेड याला मोहम्मद सिराज याने बोल्ड केलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकुदुखी ठरत होती. तेवढ्यात कॅप्टन हार्दिक पंड्याने याने स्टीव्हनचा काटा काढला. सेट झालेला स्टीव्हन 22 रन्स करुन माघारी परतला.

यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. तिसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्श याने लाबुशेनसह 52 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र मिचेल याला रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. मार्शने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मिचेल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 3 बाद 129 अशी स्थिती झाली होती.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – ट्रेव्हिस हेड, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, सीन अब्बोट, मिशेल स्टार्क, एडम झम्पा

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.