IND vs SL : विराट कोहली याचा ‘माय नेम इज लखन’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल
IND vs SL : भारत आणि श्रीलंका सामन्यामधील विराट कोहली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सामन्यामध्ये कोहलीने चाहत्यांंचं डान्स करत मनोरंजन केलं.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 302 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथ फलंदाजी करताना 357 धावांचा डोंगर उभारला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 55 धावांवर ऑल आऊट झाला. विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची शतके हुकलीत. या सामन्यामध्ये अनेक रेकॉर्ड रचले गेले, कोहली सचिनच्या वन डे मधील सर्वाधिक शतकांच्या बरोबरीचा रेकॉर्ड करता करता राहिला. सोशल मीडियावर विराटचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीचं शतक हुकलं असलं तरी गडी अजिबात नाराज दिसला नाही. भारतीय संघ फिल्डिंगसाठी मैदानात उतरला होता त्यावेळी कोहलीने डान्स करत वानखेडेवरील क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन केलं. विराट कोहलीचं शतक हुकलं असलं तरी गडी अजिबात नाराज दिसला नाही. भारतीय संघ फिल्डिंगसाठी मैदानात उतरला होता त्यावेळी कोहलीने डान्स करत वानखेडेवरील क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन केलं.बॉलिवुडमधील प्रसिद्ध गाण्यांपैकी एक असलेल्या माय नेम इज लखन यावर कोहलीने डान्सच्या स्टेप्स करत सर्वांना खूश केलं. त्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये विराट विराट असा आवाज घुमला.
पाहा व्हिडीओ-
Virat Kohli dancing on ‘My Name is Lakkhan’. pic.twitter.com/64595JKNhj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023
विराट कोहली मैदानावर असताना एनर्जेटीक असलेला पाहायला मिळतो. कोहली मैदानात येताना स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतो. नवीन उक हक याला चाहते ट्रोल करत होते त्यावेळी कोहलीने चाहत्यांना शांत केलं. खिलाडूवृत्तीचा कोहली संपूर्ण जगाने पाहिला. पण वेळ पडली तर कोणालायही नडायल मागे पुढे तो पाहत नाही.
दरम्यान, विराट कोहली ८८ धावांवर बाद झाला त्यामुळे त्याचं वन डे मधील ४९ वं शतक हुकलं. फक्त शतकच हुकलं नाहीतर सचिनच्या विक्रमाशी बरोबरी होणार होती. त्यामुळे चाहते नाराज झाले.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका