Video : नेपाळ विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली भर मैदानात भन्नाट डान्स, नेपाळी गाण्यावर ठुमके
IND vs NEP, Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ सामना सुरु आहे. या सामन्यात वारंवार पाऊस हजेरी लावत आहेत. असं असताना विराट कोहली वेगळ्याच अंदाजात दिसला. झेल सोडला तरी मैदानातील मस्ती काही सोडली नाही.
मुंबई : आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ नेपाळचा सामना करत आहे. आतापर्यंत लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. भारत आणि नेपाळ या संघात पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. दुसरीकडे सुपर फोरमध्ये जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. असं असताना भारतीय संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे क्रीडाप्रेमी आवाक् झाले आहेत. ज्या नेपाळ संघाला 150 धावांच्या आत गुंडाळायचं होतं त्या संघाने 230 धावा केल्या. सुरुवातीला तीन झेल सोडल्याने टीम इंडियाला मोठा फटका बसला असंच म्हणावं लागेल. यात विराट कोहली यानेही सोपा झेल सोडला. पण असं असूनही विराट कोहली आता वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. विराटने झेल सोडल्याचं टेन्शन न घेता सामन्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच भर मैदानात नेपाळी गाण्यावर डान्स केला.
नेपाळी गाण्यावर केला डान्स
नेपाळ फलंदाजी करत असताना 14 वं षटक संपल आणि पावसाचं सावट दिसू लागल्याने ब्रेक घेण्यात आला. या दरम्यान स्टेडियममध्ये एक नेपाळी गाणं वाजू लागलं. मग काय विराट कोहली याने थोडा वेळ इकडे तिकडे पाहिलं आणि त्या गाण्यावर डान्स करू लागला. विराट कोहलीच्या गाण्यात पहाडी स्टेप्स दिसत आहेत. विराट कोहलीचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
King Kohli using 999 IQ 🥵.He Dropped a catch earlier in the match so now he's entertaining everyone so that they will forget about it. 🥵#IndvsNEP #NEPvIND #Nepal pic.twitter.com/BFmdCIS4wr
— Islamabad United (@Hammad_PctFan) September 4, 2023
या व्हिडीओमध्ये रोहित शर्माही दिसत असून फिल्डिंग सेट करत आहे. त्यानंतर काही वेळाने विराट कोहलीने डान्स करणं बंद केलं आणि क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रीत केलं. दुसरीकडे, नेपाळने 48.2 षटकात सर्वबाद 230 धावा केल्या आणि विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं आहे. आसिफ शेख 58 आणि सोमपाल कामी याने 48 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर शमी, शार्दुल ठाकुर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी