AUS vs IND : “कोहलीला आमची गरज नाही…”, विजयानंतर कॅप्टन बुमराह असं का म्हणाला?
Jasprit Bumrah on Virat Kohli : टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला.
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात 0-3 ने कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थिती शानदार कमबॅक केलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयाने सुरुवात केली आहे. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात 295 धावांनी ‘विराट’ विजय मिळवला. टीम इंडियाने यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 238 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाचा हा ऑस्ट्रेलियातील धावांच्याबाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. तसेच इंडिया पर्थमधील ओपट्स स्टेडियममध्ये विजय मिळवणारी पहिली व्हीजीटींग टीम ठरली.
पहिल्या डावात 150 वर ऑलआऊट झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 104 धावांवर रोखलं. त्यामुळे टीम इंडियाला 46 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली या दोघांनी शतकी खेळी केली. तसेच केएल राहुल यानेही निर्णायक योगदान दिलं. केएलने 77 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल याने 161 आणि विराटने नाबाद 100 धावा केल्या. या तिघांच्या आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने भारताने दुसरा डाव 6 बाद 487 धावांवर घोषित केला.
त्यानंतर कॅप्टन बुमराहसह एकूण 5 गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं दुसऱ्या डावात पॅकअप केलं. डाव घोषित केल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी 3 तर चौथ्या दिवशी 7 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केलं. टीम इंडियाने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह याने पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तर दिली. मात्र बुमराहने विराटबाबत दिलेल्या प्रतिक्रियने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
बुमराह विराटबाबत काय म्हणाला?
“कोहलीला आमची गरज नाही, आम्हाला त्याची गरज आहे. त्याला माहित आहे की त्याला येथे काय कराची गरज आहे. विराटने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत खडतर परिस्थितीत फलंदाजी केली आहे, तो मोठ्या ठिकाणी आहे. आम्हाला विराटचा अनुभव हवा आहे”, असं बुमराह विराटबाबत म्हणाला.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.