Vamika Kohli : विराट कोहली आणि अनुष्का यांनी वामिकासंदर्भात ती धमकी देणाऱ्याबाबत घेतला मोठा निर्णय

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर एकाने कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याला पकडत अटक केली होती, अशातच या प्रकरणाबाबत मोठी माहिती समजत आहे.

Vamika Kohli : विराट कोहली आणि अनुष्का यांनी वामिकासंदर्भात ती धमकी देणाऱ्याबाबत घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 10:39 PM

मुंबई : भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. आयपीएलमध्ये चालू सीझनमध्ये कोहली खोऱ्याने धावा काढत असून संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का मुलगी वामिकाचे फोटो व्हायरल होऊ न देण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र एका सामन्यामध्ये तिचा फोटो टिपण्यात आला तो व्हायरल झालेला दिसला होता. कोहली भारताचा आयकॉन खेळाडू असल्याने त्याच्याकडून भारतीय प्रेक्षकांना कायम अपेक्षा असतात. मात्र मागे 24 ऑक्टोबर 2021 पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर एकाने कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याला पकडत अटक केली होती, अशातच या प्रकरणाबाबत मोठी माहिती समजत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींवरील हा खटला रदद केला आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव रामनागेश अकुबथिनी असं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि अनुष्काने संबंधित आरोपींना माफ केल्याचं बोललं जात आहे.

आरोपी हा हैदराबादमधील आयआयटी पदवीधर आहे. मुंबई उच्च न्यायालयात एएस गडकरी आणि पीडी नायक यांच्या खंडपीठाने सोमवारी ही तक्रार फेटाळून लावली. कोहलीचे व्यवस्थापक अकिल डिसूझा यांनी हैदराबादच्या रामनागेश अकुबथिनी नावाच्या आरोपीविरुद्धचा खटला मागे घेण्यास न्यायालयात सहमती दर्शवली होती.

जेईई अॅडव्हान्स्ड (आयआयटीची प्रवेश परीक्षा) मध्ये टॉपर आहे. मला करिअरची चिंता असून परदेशात नोकरी करायची आहे. पण या प्रकरणामुळे त्याच्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं त्याने आवाहन केलं होतं. त्यानंतर कोहली आणि अनुष्काने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना माफ केलं. कारण त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याला दुजोरा दिला. त्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे.

टीम इंडियाचा T20 वर्ल्ड कपमध्ये 24 ऑक्टोबर 2021 ला पाकिस्तान संघाने पराभव केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर आयआयटी हैदराबादमधून पदवीधर झालेल्या रामनागेशने वाईट कमेंट केली होती. 8 नोव्हेंबर 2021 रोजी सोशल मीडियावर धमक्या दिल्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 11 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटकेनंतर अवघ्या 9 दिवसांत आरोपींना जामीनही मिळाला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.