मोठ्या मनाचा विराट कोहली! ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मागितली ती खास गोष्ट, भावाने देऊन टाकली, पाहा Video
विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली कांगारूंच्या खेळाडूंनी काहीतरी देत असल्याचं दिसत आहे.
मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी चौथा कसोटी सामना खास ठरला. या सामन्यामध्ये विराट कोहलीने 186 धावांची दमदार खेळी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. हा सामना अनिर्णित राहिला तरीसुद्धा विराटने केलेली खेळी महत्त्वाची ठरली. तर भारताने सलग चौथ्यांदा कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. प्लेअर ऑफ द मॅच ने विराटला गौरवण्यात आलं. अशातच कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली कांगारूंच्या खेळाडूंनी काहीतरी देत असल्याचं दिसत आहे.
कसोटी संपल्यानंतर दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विराट कोहलीला त्याची टेस्ट जर्सी मागितली आणि विराटनेही मोठ्या मनाने त्यांना ती जर्सी भेट दिली. डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी यांनी विराट कोहलीची भेट घेतली होती. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
King Kohli ? had some memorabilia to give to his Australian teammates post the final Test ????
Gestures like these ??#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/inWCO8IOpe
— BCCI (@BCCI) March 13, 2023
अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. विराट कोहलीने 1205 दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवलं. इतकंच नाही तर 40 महिन्यांनंतर विराट कोहलीला कसोटीत सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. विराटने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 10 किंवा त्याहून अधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा विराट कोहली एकमेव खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 38 वेळा आणि टी-20मध्ये 15 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्या डावात 480 धावा केल्या. टीम इंडियाने या प्रत्युत्तरात 571 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 91 धावांची आघाडी मिळाली. मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत बॅटिंग करत सामना ड्रा केला. यासह टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा बॉर्जर गावसकर ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा हा घरातला सलग 16 वा मालिका विजय ठरला आहे.