Virat ने पराभवानंतर जिंकली मनं, नेटकरी म्हणाले कोहली धोनीपेक्षा मोठ्या मनाचा

Virat Kohli And M S Dhoni : आरसीबीच्या पराभवानंतरही विराटची एक कृती नेटकऱ्यांना भावली. नेटकऱ्यांना यानंतर महेंद्रसिंह धोनीची आठवण का झाली? जाणून घ्या.

Virat ने पराभवानंतर जिंकली मनं, नेटकरी म्हणाले कोहली धोनीपेक्षा मोठ्या मनाचा
dhoni virat kohliImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 2:04 AM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18 मे रोजी सलग सहावा सामना जिंकून प्लेऑफमध्ये धडक मारली. आरसीबीने फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंगसचा पराभव करुन प्लेऑफचं तिकीट मिळवलं. मात्र त्यानंतर आरसीबीचं 22 मे रोजी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न यंदाही अधुरं राहिलं. आरसीबीला एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभूत व्हावं लागलं. आरसीबीने पहिले बॅटिंग करुन राजस्थानसमोर 173 धावांचं आव्हान ठेवलं. राजस्थानना हा सामना 6 बॉल शेष राखून 4 विकेट्सने जिंकला. राजस्थानने 6 विकेट्स गमावून 19 ओव्हरमध्ये 174 धावा केल्या. राजस्थान-आरसीबी सामन्यानंतर उभयसंघातील खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. विराट कोहलीने पराभवानंतरही राजस्थानच्या खेळाडूंचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कृतीनंतर नेटकरी सक्रीय झाले आणि त्यांनी धोनीसह तुलना करत विराट कसा मनाचा मोठा आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

आरसीबीचं या पराभवामुळे चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. आरसीबी 17 व्या वर्षानंतरही ट्रॉफी जिंकू शकली नाही. मात्र विराटने राजस्थानला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. तेव्हा विराटने राजस्थानच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. नेटकऱ्यांनी विराटची हीच कृती हेरली आणि तो धोनीपेक्षा कसा सरस आहे, हे दाखवण्याच प्रयत्न केला. नेटकऱ्यांनी विराट धोनीपेक्षा कसा मोठ्या मनाचा आहे, हे सांगण्यामागे पार्श्वभूमी आहे. आरसीबीने 18 मे रोजी सीएसकेला पराभूत करत त्यांचं आव्हान सुपंष्टात आणलं. आरसीबाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी तो सामना नेट रनरेटने जिंकायचा होता. आरसीबीने ते करुन दाखवलं. त्यामुळे आरसीबीचे खेळाडू विजयानंतर जल्लोष करत होते.

तर दुसऱ्या बाजूला पराभवानंतर धोनी डगआऊटमधून हस्तांदोलनासाठी आरसीबीच्या खेळाडूंची वाट पाहत होता. मात्र आरसीबीचे खेळाडू जल्लोष करत होते. आता धोनीचा इथे इगो दुखावला की आणखी काही माहिती नाही, मात्र काही क्षण वाट पाहिल्यानंतर धोनी हात झटकत तावातावात निघून गेला. धोनीची ही कृती नेटकऱ्यांना पटली नाही. तर आता राजस्थानच्या विजयानंतर विराटने मनाचा मोठेपणा दाखवला. नेटकऱ्यांनी हाच मुद्दा हेरुन विराट कसा सरस आहे, हे दाखवलं.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.