IND vs AUS Test : Live मॅचमध्ये Virat Kohli ने अंपायर नितीन मेनन यांना टोमणा मारला, VIDEO व्हायरल

| Updated on: Mar 13, 2023 | 2:04 PM

IND vs AUS Test : विराट कोहली काहीच विसरला नाहीय. ऐका काय म्हणाला? VIDEO. हमदाबाद कसोटीच्या पाचव्यादिवशी विराट कोहलीने अंपायर नितीन मेनन यांच्ंया निर्णयावर कमेंट केली.

IND vs AUS Test : Live मॅचमध्ये Virat Kohli ने अंपायर नितीन मेनन यांना टोमणा मारला, VIDEO व्हायरल
virat kohli
Follow us on

IND vs AUS 4th Test : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी शानदार शतक झळकवलं. आज पाचव्यादिवशी विराट कोहली दुसऱ्या एका कारणामुळे चर्चेत आहे. विराट कोहलीने मैदानात फिल्डिंग करताना अंपायर नितीन मेनन यांना टोमणा मारला. नितीन मेनन यांनी अनेकदा विराट कोहलीला बाद दिलय. त्यांचे काही निर्णय विराटला पटले नव्हते. विराट ही गोष्ट विसरलेला नाही. त्यामुळेच अहमदाबाद कसोटीच्या पाचव्यादिवशी विराट कोहलीने अंपायर नितीन मेनन यांच्ंया निर्णयावर कमेंट केली.

ऑस्ट्रेलियाय्या इनिंगमध्ये 35 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ट्रेविस हेड विरोधात LBW च अपील झालं. त्यावर नितीन मेनन यांनी नॉटआऊट दिलं. टीम इंडियाने रिव्यू घेतला. थर्ड अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर विराट कोहलीने नितीन मेनन यांच्या निर्णयावर कमेंट केली.

विराटचा टोमपणा कशामुळे कळला?

विराट कोहली नितीन मेनन यांच्या निर्णयावर म्हणाला की, ‘मी असतो, तर आऊट दिलं असतं’ विराट कोहलीचा हा आवाज स्टम्पच्या माइकमुळे स्पष्ट ऐकू आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

दुसऱ्या कसोटीत वादग्रस्त पद्धतीने आऊट

बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या दुसऱ्या दिल्ली कसोटीत विराट कोहली वादग्रस्त पद्धतीने आऊट झाला होता. कुहनेमनच्या बॉलिंगवर विराट कोहलीला LBW आऊट देण्यात आलं होतं. विराट बाद देण्याचा निर्णय नितीन मेनन यांनी घेतला होता. विराट कोहलीने अंपायरच्या निर्णयाविरोधात DRS घेतला. रिप्लेमध्ये थर्ड अंपायर चेंडू पहिला बॅटवर लागला की, पॅडवर हे ठरवू शकले नाहीत.

संधी मिळताच मारला टोमणा

त्यानंतर थर्ड अंपायरने मैदानावरील पंच नितीन मेनन यांच्या निर्णयाच समर्थन केल. त्यामुळे विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. हा निर्णय विराट कोहलीला पटला नव्हता. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ही घटना विराट विसरलेला नाही. त्यामुळे अहमदाबाद कसोटीत संधी मिळताच त्याने नितीन मेनन यांना टोमणा मारला.