Virat kohli Century : विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात शतक झळकवलय. त्याच्या क्रिकेट करिअरमधील हे 75 व आणि टेस्टमधील 28 व शतक आहे. मागच्या 2 महिन्यात विराटने चांगली कामगिरी केलीय. त्याने 3 सेंच्युरी झळकवल्या आहेत. या सेंच्युरीआधीच वैशिष्ट्य म्हणजे विराट कोहली नीम करोली बाब आणि महाकालच्या दर्शनाला गेला होता. मंदिरात माथा टेकवल्यातंर विराटने आपलं शतकाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली.
त्याने मागच कसोटी शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये झळकवलं होतं. अहमदाबादच्या शतकाआधी विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकालच दर्शन घेतलं.
पराभवानंतर महाकाल
बॉर्डर-गावस्कर सीरीजचा तिसरा कसोटी सामना इंदोरमध्ये खेळला गेला. भारताला या कसोटी सामन्यात 9 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत विराटची बॅट तळपली नाही. इंदोरमधील पराभवानंतर विराट कोहली उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला होता. तो तिथे भस्म आरतीमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. अहमदाबादमध्ये विराटने टीम अडचणीत असताना शतकी खेळी साकरली आहे. त्यामुळे करिअरमधील या 75 व्या शतकाच मोल मोठं आहे.
The Man. The Celebration.
Take a bow, @imVkohli ??#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/QrL8qbj6s9
— BCCI (@BCCI) March 12, 2023
नीम करोली बाबांच दर्शन त्यानंतर शतक
कोहली वर्षाच्या सुरुवातीला वृंदावनच्या नीम करोली बाबांच्या आश्रमात गेला होता. त्यानंतर त्याने पुढच्याच सामन्यात गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध 113 धावा फटकावल्या. श्रीलंकेविरुद्ध त्याची बॅट तिरुवनंतपूरममध्येही तळपली. कोहलीने तिथे 166 धावा ठोकल्या.
विराट कोहली त्याआधी मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंडच्या नीम करोली बाबांच्या दर्शनासाठी पोहोचला होता. त्यानंतर त्याने बांग्लादेश विरुद्ध शतक ठोकलं. आता 3 वर्षानंतर त्याच्या बॅटमधून टेस्ट क्रिकेटमध्ये शतक निघालय.