Virat Kohli : हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर विराट कोहली याने मौन सोडलंच, म्हणाला…
क्रिकेट वर्तुळात सर्वत्र लखनऊमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याची चर्चा आहे. अशातच यावर कोहलीची यावर प्रतिक्रिया आली आहे.
मुंबई : सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही पुन्हा एकदा भर मैदानात भिडताना दिसले. दोघांमधील वाद काही नवीन नाही पण त्यामुळे क्रिकेटच्या प्रतिमेला डाग लागत आहे. कोहलीचं लखनऊ संघामधील काईले मेअर्स, नवीन उल हक, अमित मिश्रा आणि गौतम गंभीर यांच्यासोबत वाजलं. मैदानातील झकाझक सर्वांनी पाहिली. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात सर्वत्र लखनऊमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याची चर्चा आहे. अशातच यावर कोहलीची यावर प्रतिक्रिया आली आहे.
विराट कोहली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली आहे. स्टोरीमध्ये, आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही, अशा आशयाचा कोट कोहलीने पोस्ट केला आहे.
विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखे दिसले. फक्त काहीतरी निमित्त होतं आणि दोघे एकमेकांना भिडतात. गंभीर आता काही खेळाडू नसून मेंटॉर आणि माजी लेजेंड खेळाडू आहे. किमान त्याने तरी अशा परिस्थितीमध्ये संयम ठेवायला हवा. विराट कोहली चुकीचं वागलाच तर त्याला दंड होणारच आहे. पण नाही गौतम गंभीरसुद्धा एखाद्या युवा खेळाडूसारखा लगेच आक्रमक होऊन हमरीतुमरीवर येतो. याचा फटका म्हणजे आता दोन्ही खेळाडू अनेक युवा खेळाडूंचे आयकॉन आहेत. त्या खेळाडूंनी यांच्याकडून कसला आदर्श घ्यायचा?
काय सुनावली शिक्षा?
कोहली आणि गंभीर दोघेही IPL च्या आचार संहिता उल्लंघनात दोषी ठरले आहेत. याची शिक्षा म्हणून त्यांची मॅच फी कापण्यात आली आहे. दोघांना लखनौमधील सामन्याची मॅच फी मिळणार नाही. शिक्षा म्हणून त्यांची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली. विराट RCB च प्रतिनिधीत्व करतो. गौतम गंभीर लखनौ टीमचा मार्गदर्शक आहे.