वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, विचित्र पोस्टमुळे संभ्रमाचं वातावरण

विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव आहे. त्याचा फॅन क्लबही मोठा आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर असते. आता विराटच्या एका इंस्टास्टोरीने संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, विचित्र पोस्टमुळे संभ्रमाचं वातावरण
विराट कोहली कहना क्या चाहते हो..! इंस्टाग्राम स्टोरीमुळे सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 9:23 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसा असेल याबाबत चर्चा सुरु आहेत. असं असताना विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या आठवड्याभरापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ही पोस्ट नेटकऱ्यांच्या डोक्यावरून गेली आहे. या स्टोरीचा नेमका अर्थ काय? आणि कोणासाठी लिहिली असावी असा प्रश्न पडला आहे.

आयपीएल 2023 मध्ये इंस्टाग्रामवर वॉर रंगलं होतं. या स्पर्धेत आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात वाद झाला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या इंस्टाग्राम क्रिप्टिक पोस्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. अशीच एक क्रिप्टिक पोस्ट त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवानंतर केली होती.

विराट कोहलीने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी केली आहे. यामुळे फॅन्स संभ्रमात पडले आहेत. विराट कोहलीने इंस्टा स्टोरीत आध्यात्मिक गुरु रुपर्ट स्पिरा यांचा एक कोट टाकला आहे. त्यात लिहिलं आहे की, ‘प्रेम हे आपल्या सामायिक अस्तित्वाची ओळख आहे. तू तो आनंद आहेस जो तुला हवा आहे.’ या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

दुसरीकडे, टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीची संपत्ती 1 हजार कोटींची पार पोहोचली आहे. विराट कोहलीच्या नेटवर्थचा खुलासा स्टॉक ग्रो कंपनीने केला आहे. इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे 25 कोटी 30 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी विराट कोहली 8.9 कोटी चार्ज करतो. ट्विटरवर पोस्टसाठी 2.5 कोटी मिळतात. त्याचबरोबर विराट कोहली 18 हून अधिक ब्रांडची जाहीरात करतो.

कोहलीकडे मुंबई आणि गुरुग्राममद्ये अलिशान घर आहे. मुंबईच्या घराची किंमत 80 कोटी रुपये आहे. तर गुरुग्राममधील घराची किंमत 31 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर कोहली एफसी गोवा फुटबॉल क्लबचा मालक आहे. एफसी गोवा इंडियन सुपर लीगमधील संघ आहे.

विराट कोहलीची क्रिकेट कारकिर्द

विराट कोहली 109 कसोटी, 274 वनडे, 115 टी 20 आणि 237 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत विराट कोहलीने 8479 धावा केल्या आहेत. यात 7 द्विशतक, 28 शतकं आणि 28 अर्धशतकं झळकावली आहेत. वनडेत विराट कोहलीने 12898 धावा केल्या आहेत. यात 46 शतकं आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये विराट कोहलीने 1 शतक आणि 37 अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्ये 7263 धावा केल्या असून यात 7 शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.