Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल
विराट कोहली हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. कारण आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा त्याच्याच नावावर आहेत.
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं नेतृत्व करतोय. विराट हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. कारण आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा त्याच्याच नावावर आहेत. एकाच मोसमात सर्वात जास्त धावा फटकावण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. IPL 2016 मध्ये विराटने 16 सामन्यांमध्ये 81.08 च्या सरासरीने तब्बल 973 धावा फटकावल्या होत्या. यामध्ये 4 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
फलंदाज म्हणून विराट यशस्वी असला तरी एक कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये स्वतःची छाप पाडण्यात विराट अपयशी ठरला आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने अद्याप आयपीएलच चषक उंचावलेला नाही. तसेच विराटच्या नेतृत्वात आरसीबीने कधी अंतिम फेरीदेखील गाठलेली नाही. विराट यंदा आयपीएलमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरणार नाही. तसेच आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी विराट आणि त्याची सेना प्रयत्न करताना दिसेल.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
18 ऑगस्ट 2008 ला विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे त्याने पदार्पण केले. विराट हा गेल्या दशकातला सर्वोत्तम फलंदाज आहे. या दशकात एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. तसेच शतकंदेखील ठोकली आहेत. टी-20 क्रिकेटमध्येदेखील तो एक यशस्वी फलंदाज आहे.
आतापर्यंत 91 कसोटी सामन्यांमध्ये विराटने देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे, त्यात त्याने 153 डावात 7490 धावा फटकावल्या आहेत. यामध्ये 27 शतकं आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने 252 सामन्यांमध्ये 43 शतकं आणि 61 अर्धशतकांच्या मदतीने आणि 59.3 च्या सरासरीने 12096 धावा फटकावल्या आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये विराटने 90 सामन्यांमध्ये 3159 धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने 28 अर्धशतकं ठोकली आहे. 94 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयपीएलमध्ये अव्वल
आयपीएलमध्ये विराटने 192 सामन्यांमध्ये 38.2 च्या सरासरीने आणि 130.7 च्या स्ट्राईक रेटने 5878 धावा फटकावल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. आयपीएलमध्ये विराटने 5 शतकं आणि 39 अर्धशतकं ठोकली आहेत. 50 चेंडूत 113 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहेत.
विराटच्या संपूर्ण कारकीर्दीचा लेखाजोखा
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
नाबाद
|
धावा
|
HS
|
सरासरी
|
चेंडू
|
चेंडू
|
स्ट्राईक रेट
|
शतकं
|
अर्धशतकं
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी
2011 पासून
|
91
|
153
|
10
|
7490
|
254*
|
52.4
|
13112
|
336
|
57.1
|
27
|
25
|
ODI
2008 पासून
|
252
|
243
|
39
|
12096
|
183
|
59.3
|
12972
|
148
|
93.2
|
43
|
61
|
T20I
2010 पासून
|
90
|
84
|
24
|
3159
|
94*
|
52.6
|
2272
|
50
|
139.0
|
0
|
28
|
IPL
2008 पासून
|
192
|
184
|
30
|
5878
|
113
|
38.2
|
4496
|
50
|
130.7
|
5
|
39
|