विराट कोहली बनला दुसऱ्यांदा बाबा, वामिकाला भाऊ की बहिण? नावंही समोर!

Virat kohli Second Child Name : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. विराट कोहली याला पुत्ररत्न झालं असून त्यांनी आपल्या मुलाचं खास नाव ठेवलं आहे.

विराट कोहली बनला दुसऱ्यांदा बाबा, वामिकाला भाऊ की बहिण? नावंही समोर!
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 9:58 PM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. विराट कोहली याला पुत्ररत्न झालं असून त्यांनी आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. विराट आणि अनुष्का यांनी ही गोष्ट गेल्या अनेक दिवसांपासून लपवून ठेवली होती. आज अनुष्का शर्माने पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. या दोघांनीही ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. आतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितलं होतं. मात्र त्याने परत आपलं वक्तव्य माघारी घेतलं होतं. पण ते खरं असल्याचं आज समोर झालं आहे.

15 फेब्रुवारीला अनुष्काने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मात्र याबाबत पाच दिवसांनी त्यांनी जाहीरपणे याबाबत माहिती दिली. विराट कोहली आता सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये न खेळण्याचं खरं कारण आता समोर आलं आहे. विराट कोहली आणि अनुष्का यांनी वामिका नावाची मुलगी आहे.

दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लग्नानंतर अनुष्का चित्रपटांपासून दूर आहे. 2018 मध्ये झिरो हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही. वामिकाचा चेहरा त्यांंनी सर्वांपासून लपवून ठेवला होता. मात्र एका सामन्यामध्ये कॅमेरामध्ये कॅच झाल्यावर कोहलीच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी अनुष्का आणि विराटने फोटो व्हायरल करू नका अशी विनंती केली होती. यावेळी मात्र त्यांनी गुप्तता ठेवलेली पाहायला मिळाली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.