ना मीडिया..ना फॅन्स…! लंडनमध्ये विराट कोहली मनमोकळेपणाने फिरतोय एकटा, पाहा Video

विराट कोहली सध्या लंडनमध्ये असून मनमोकळेपणाने फिरण्याचा आनंद लुटत आहे. भारतात विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा असतो. अशात मनमोकळेपणा अनुभवता येत नाही. अनेकदा विराट कोहलीने मुलाखतीत दिल्लीतील जुन्या आठवणींनाही उजाळा देत ही बाब अधोरेखित केली होती.

ना मीडिया..ना फॅन्स...! लंडनमध्ये विराट कोहली मनमोकळेपणाने फिरतोय एकटा, पाहा Video
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 7:59 PM

भारतीय क्रिकेट विश्वातील विराट कोहली हे मोठं नाव आहे. त्याने आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दित एक एक करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. तसेच अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे विराट कोहलीचा संपूर्ण जगात एक वेगळाच चाहता वर्ग आहे. विराट कोहलीसोबत सेल्फी असो की त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी होते.  देशात मनमोकळेपणानं फिरणं कठीण होतं. त्यामुळे विराट कोहली सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी विदेश दौऱ्यावर असतो. खासकरून लंडनमध्ये विराट कोहली बऱ्याचदा गेल्याचं दिसून आलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर विराट कोहली लंडनला गेला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका खेळला आणि आता पुन्हा लंडनला गेला आहे. लंडनमधील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली एकटाच रस्ता पार करताना दिसत आहे.

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या दोन मुलांसह लंडनमध्ये आहे. विराट कोहलीला जेव्हा कधी क्रिकेटमध्ये ब्रेक मिळतो तेव्हा लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतो. विराट कोहलीने यापूर्वी काही मुलाखतींमध्ये मनमोकळेपणाने राहायचं असल्याचं सांगितलं होतं. मुलाखतीत त्याने दिल्लीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेच मार्केटमधील आठवणींमध्ये रमला होता. पण स्टारडममुळे आता असं मोकळेपणाने फिरणं कठीण झालं आहे. दुसरीकडे, विराट कोहली लंडनमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.

विराट कोहली आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वनडे क्रिकेट खेळला. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला पण काही खास करू शकला नाही. तिन्ही वनडे सामन्यात धावा करताना कस लागला. दुसरीकडे, विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार अशी चर्चा होती. पण त्या बातम्यांना पूर्णविराम लागला आहे. विराट कोहली आता थेट बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात दिसणार आहे. विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीचा खरं तर हा शेवटचा टप्पा सुरु आहे. टी20 क्रिकेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.  विराट कोहलीचं फिटनेस पाहता आणखी वनडे-कसोटीमध्ये चार ते पाच वर्षे क्रिकेट खेळू शकतो. फॉर्म कायम राहिला तर आणखी काही काळ त्याच्या फलंदाजीचा आनंद चाहत्यांना लुटता येईल. दरम्यान या काळात विराट कोहली काही विक्रमांना गवसणी घालणार हे निश्चित आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.