IND vs NZ : विराट कोहली सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला देणार धोका? भारतीय गोटात खळबळ!

IND vs NZ Semi Final : भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची फार मोठी संधी आहे, फक्त एक मोठा अडथळा पार करावा लागणार आहे तो म्हणजे न्यूझीलंड संघ. फायनलपेक्षा या सामन्यात भारतासाठी मोठं आव्हान असणार आहे. मात्र भरवशाचा फलंदाज असलेल्या कोहलीनेच टेन्शन वाढवलं आहे.

IND vs  NZ : विराट कोहली सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला देणार धोका? भारतीय गोटात खळबळ!
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 10:47 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि न्युझीलंडमधील सेमी फायनल सामना सुरू व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना पार पडणार आहे. या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याच्याकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत. मात्र विराटवर विश्वास ठेवणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. कारण इतिहासावर नजर मारली आणि आकडेवारी पाहिली तर विराटनेच धोकाच दिला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

कशी आहे विराट कोहलीची कामगिरी?

2011 चा वर्ल्ड कर पाहिला तर उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यातील डावात विराटने फक्त 68 धावा केल्या आहेत. यामधील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये केलेल्या 35 धावा महत्त्वाच्या ठरल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशविरुद्ध 3 धावा आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 धाव काढून बाद झाला होता. 2019 मध्येही उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध केवळ 1 धाव काढून बाद झाल होता. त्यामुळे कोहलीचे नॉकआऊटमधील सामन्यांमध्ये अवघ्या 73 धावा केल्या आहेत.

2011 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या वहाब रियाझने त्याची विकेट घेतलेली, 2015 ला मिचेल जॉन्सन तर 2019 ला न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने त्याला माघारी पाठवलं होतं. नॉक आऊट सामन्यामध्ये कोहलीची कामगिरी एकदम सामान्य आहे. त्यामुळे कोहलीच्या भरोशावर राहून राहता येणार नाही. टीम मॅनेजमेंटला प्लॅन बी तयार ठेवावा लागणार आहे. नाहीतर लीग स्टेजमधील सामन्यांमध्ये अपराजित राहिलेल्या भारताला एक पराभव बाहेर करू शकतो.

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली यादीत एक नंबरला आहे. मात्र कोहलीची ही कमजोरी विरोधी संघालाही माहित असणार आहे. त्यामुळे त्यानेही सावध खेळ करत हा नकोसा डाग आपल्या नावावरचा काढायला हवा.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारताचा संघ: रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.