Video : विराट कोहली याला जयदेव उनाडकट याने दाखवला इंगा, झालं असं की मान खाली घालून निघून गेला
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे. द्विपक्षीय मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाने आपल्यातच एक सराव सामना खेळला. या सामन्यात विराट कोहलीने तीच चूक परत केली.
मुंबई : कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी टीम इंडियाने बारबाडोसमध्ये आपल्यातच एक सराव सामना खेळला. या सामन्यातही विराट कोहली याने नको तीच चूक केली. विराट कोहली कायम पाचव्या स्टम्पवर आपली विकेट गमावतो असं आतापर्यंतच चित्र आहे. उनाडकट याने ही बाब बरोबर हेरली होती आणि त्याच प्रमाणे चेंडू टाकत विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला. विराट कोहलीला जयदेव उनाडकटचा चेंडू कळलाच नाही आणि स्लिपला झेल देऊन तंबूत परतला.
विराट कोहली याने केली तीच चूक
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे एका संघात, तर जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे गोलंदाज दुसऱ्या संघात होते. पहिल्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली फलंदाजी करत. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल फलंदाजी आले. पण विराट कोहली जास्त तग धरू शकला नाही. जयदेव उनाडकट याने त्याला आपल्या चक्रव्युहात अडकवत बाद केलं.
Virat kohli is dismissed to unadkat in the practice match. pic.twitter.com/GNGKzrRpyd
— MOHIT SHUKLA (@MohitShukla1030) July 5, 2023
मर्यादित षटकांच्या सामन्यात विराट कोहली याला सूर गवसला आहे. मात्र कसोटीत सूर गवसताना दिसत नाही. मागच्या तीन वर्षात विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरला आहे. विराट कोहली याने 23 कसोटी सामन्यात 31.76 च्या सरासरीने 1239 धावा केल्या. यात एक शतक आणि अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान होणार आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्याच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली.