Mankading Video : विराट कोहलीचं मँकाडिंग रन आऊट, पाहा व्हिडीओ
इंग्लंडच्या सामन्यातील रनआऊट व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. आता विराट-सुनील नरेनचाही व्हिडीओ पाहा...
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात मँकडिंगचा (Mankading) मुद्दा चांगलाच चर्चेत आला. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) महिला क्रिकेट संघ यांच्यातील गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यावरून निर्माण झालेला मँकाडिंग वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. इंग्लिश फलंदाज चार्ली डीनला अनेक वेळा समजावून सांगितल्यानंतर दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) मँकाडिंग केल्याच समोर आलंय. यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडालीय. हा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आहे. यावर पराजय झाल्यानं इंग्लंडच्या संघाला काही पचनी पडल्याचं दिसत नाही. तर दीप्ती शर्मालाही टार्गेट केलं जातंय.
जुना व्हिडीओ चर्चेत
यासंपूर्ण प्रकरणावर दीप्तीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. दीप्तीच्या म्हणण्यानुसार इंग्लिश फलंदाज चार्ली डीनला आधी इशारा देण्यात आला होता. पण, तरीही ती वारंवार क्रीजच्या बाहेर गेल्यानं चेंडू स्टंपला लावण्यात आलं.
इंग्लंडचा संघ म्हणतोय की, चार्लीला कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. या सगळ्या दरम्यान आता आयपीएलचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हिडीओत फिरकीपटू सुनील नरेननं विराट कोहलीला अशाच प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न करत होता. पण, किंग कोहली त्याच्या दोन पावले पुढे गेला.
हा व्हिडीओ पाहिला का?
Virat Kohli funny moment “Mankading” pic.twitter.com/B6i7dfvLHe
— Sahil ? (@Sahil__018) September 25, 2022
नेमकं काय घडलं?
चार्लीला आधी सतर्क करण्यात आलं होतं. ती वारंवार क्रीज सोडून जातेय, हे तिला सांगण्यातही आलं होतं. पण, तिने दर्लक्ष केलं आणि इंग्लंडचा पराभव झाला. मात्र, हे पराभवाचं खापर आता इंग्लंडकडून भारतावर फोडण्याचं काम सुरु आहे.
मॅनकाडिंग रनआउट
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे सर्व नियम यावर्षी 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.