रोहित शर्मा की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? मोहम्मद शमीचं बेधडक उत्तर

रोहित शर्मा (Rohit Sharma) की विराट कोहली (Virat Kohli), या दोघांपैकी सर्वोत्तम कर्णधार कोण?, अशी चर्चा नेहमीच रंगत असते. याच प्रश्नाचं उत्तर भारतीय संघातल्या एका सिनिअर बोलरने त्याच्या पद्धतीने दिलं आहे.

रोहित शर्मा की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? मोहम्मद शमीचं बेधडक उत्तर
विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 8:04 AM

मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) की विराट कोहली (Virat Kohli), या दोघांपैकी सर्वोत्तम कर्णधार कोण?, अशी चर्चा नेहमीच रंगत असते. विराट-रोहितचे फॅन्स सोशल मीडियावर ही चर्चा नेहमी करत असतात. किंबहुना गेल्या काही वर्षात रोहित आणि विराटमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे कर्णधारपदावरुन दोघांमध्ये रस्सीखेच असल्याची चर्चा नेहमी होते. पण याच प्रश्नाचं उत्तर भारतीय संघातल्या एका सिनिअर बोलरने त्याच्या पद्धतीने दिलं आहे. विराट की रोहित, कर्णधार म्हणून दोघांपैकी अधिक चांगलं कोण? असा प्रश्न मोहम्मद शमीला विचारण्यात आला. यावेळी त्याने इशाऱ्या इशाऱ्यात रोहित शर्माला आपली पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. थेट जरी त्याने रोहित शर्माचं नाव घेतलं नसलं तरी त्याने रोहितची एकंदर केलेली स्तुती पाहून साहजिक शमीला रोहित कर्णधार म्हणून भावतो, याचा उलगडा झाला. ((Virat Kohli Or Rohit Sharma Who Is best Captain Mohammed Shami big statement))

शमीकडून रोहितची तोंडभरुन स्तुती

भारतीय संघातील सिनिअर खेळाडू जो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करतो त्या मोहम्मद शमीने भारतीय संघाच्या लिमिटेड ओव्हर्सचा उपकर्णधार रोहित शर्माची तोंडभरुन स्तुती केली. शमी म्हणाला, “बोलर म्हणून मी जेव्हाही कधी रोहितकडून सल्ला घेण्यास जातो, त्यावेळी मला तो नेहमी सकारात्मक सल्ला देतो. रोहित सातत्याने गोलंदाजांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलाय. तो गोलंदाजांना मोकळीक देतो, हवी तशी गोलंदाजी करण्याची परवानगी देतो, नवीन प्रयोग करण्याला पाठबळ देतो.. मग एका गोलंदाजासाठी यापेक्षा दुसरं काय हवं असतं…!”

रोहित एक वेगळ्या स्वभावाचा व्यक्ती आहे. तो नेहमी कूल असतो. बॅटिंग करताना मात्र तो शांत नसतो. त्याच्या पद्धतीने तो समोरच्या गोलंदाजांचा समाचार घेत असतो, असंही सांगायला शमी विसरला नाही.

विराटविषयी काय म्हणाला मोहम्मद शमी?

खास करुन वेगवान गोलंदाज आक्रमक असतात पण भारतीय संघात उलटं आहे. आमचा कर्णधार (विराट) जास्त आक्रमक आहे. मी अनेक वेळा सोशल मीडियावर मॅचचे फोटो पाहतो. त्यावेळी कधी कधी मला प्रश्न पडतो विकेट मी घेतलीय की विराटने… मी अनेकदा चेष्टेत विराटला म्हटलं देखील आहे, ती विकेट मी घेतली होती की तू घेतली होती?. विराट गोलंदाजांपेक्षा अधिक सेलिब्रेशन करतो. त्याच्यामध्ये आक्रमकता आहे, तो टीमचं नेतृत्व शानदार पद्धतीने करतो

(Virat Kohli Or Rohit Sharma Who Is best Captain Mohammed Shami big statement)

हे ही वाचा :

WTC Final : न्यूझीलंडच्या या 3 खेळाडूंपासून विराटसेनेला धोका, फायनल मारायचीय तर खेळाडूंपासून ‘बच के रहेना!’

भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा, या दोन दिग्गजांनी कोरोनाला हरवलं!

Video : ‘मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे,’ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी जीममध्ये घाम गाळतोय चेतेश्वर पुजारा

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.