विराट कोहली याने वादग्रस्त पद्धतीने आऊट झाल्यानंतर ‘हे’ काय केलं? व्हीडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्यामुळे विराट कोहली चांगलाच संतापला होता. मात्र एका क्षणात विराटचा हा राग निवळला.

विराट कोहली याने वादग्रस्त पद्धतीने आऊट झाल्यानंतर 'हे' काय केलं? व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 9:34 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ संपला. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. विराट कोहली याच्यासाठी दुसरा दिवस फार वाईट ठरला. विराट कोहली याला चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं. त्यामुळे विराट कोहली याला राग अनावर झाला. फिल्ड अंपायरला नक्की नसतानाही त्याने बाद घोषित केलं. थर्ड अंपायरने फिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवत विराट याला आऊट जाहीर केलं. यामुळे विराट चांगलाच संतापला. विराटने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन आपला राह सहकाऱ्यांसमोर व्यक्त केला. मात्र विराट याचा राग एका झटक्यात जसा वाढला, त्यापेक्षा किती तरी वेगाने विराट खूश झाला. विराटची ही रिएक्शन व्हायरल झाली आहे. विराटचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

…आणि विराट खूश

दिल्ली म्हणजे खाणाऱ्यांची चंगल. अनेक खवय्ये इथे आल्यावर नक्कीच छोले भटुरे आवर्जून खातात. विराट याचंही छोले भटुरे प्रेम जगजाहीर आहे. विराट कोच राहुल द्रविड याच्यासोबत बसला होता. इतक्यात त्याच्या मागून सपोर्ट स्टाफमधील सदस्य येतो. विराटला हळूच खुणावतो. यावर विराट हसतो, आणि थोड्या वेळात येतो, असं आपल्या हावभावातून सांगताना या व्हीडिओत दिसतोय.

हे सुद्धा वाचा

विराटची रिएक्शन व्हायरल

पंचाचा वादग्रस्त निर्णय

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 50 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. मॅथ्यू कुहनेमन ही ओव्हर टाकत होता. विराट या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एलबीडबल्यू आऊट झाला. विराट 44 धावांवर माघारी परतला.

कुहनेमन याने टाकलेल्या बॉलवर एलबीडब्ल्यूचा निर्णय फार क्लोज होता. बॉल आधी विराटच्या बॅटला लागला की पॅडला, हे स्पष्ट दिसलं नाही पण फिल्ड अंपायरने त्याला आऊट घोषित केलं.

विराटने अपांयरच्या या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेतला. आता विषय थर्ड अपांयराच्या कोर्टात गेला. थर्ड अंपायरने उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा वापर केला. मात्र थर्ड अंपायरला स्पष्टपणे कळू शकलं नाही. विराट आऊट असल्याचा पुरावा थर्ड अंपायरकडे पण नव्हता.

थर्ड अंपायर यालाही समजू शकलं नाही की बॉल आधी पॅडला लागलाय की बॅटला. परिणामी फिल्ड अंपायर याने दिलेला सॉफ्ट निर्णय ग्राह्य धरुन विराटला आऊट जाहीर करण्यात आलं.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.