Unseen Video : वनडे वर्ल्डकप पराभवानंतर विराट कोहलीची मैदानात अशी होती रिॲक्शन

| Updated on: Jan 02, 2024 | 6:37 PM

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पराभवाची सळ अजूनही भारतीयांच्या मनात ताजी आहे. कारण शेवटच्या सामन्यात हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून घेतला होता. त्यामुळे दहा वर्षानंतर आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याचं स्वप्न भंगलं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अश्रू अनावर झाले होते. आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Unseen Video : वनडे वर्ल्डकप पराभवानंतर विराट कोहलीची मैदानात अशी होती रिॲक्शन
Unseen Video : ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप जिंकताच विराट कोहलीने मैदानात असं काही केलं
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारताने धडक मारली होती. उपांत्य फेरीपर्यंत भारताने एकही सामना गमावला नव्हता. मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. या पराभवाची सळ अजूनही भारतीयांच्या मनात कायम आहे. विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. कोहलीने 11 सामन्यातं 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर अंतिम फेरीत अर्धशतकही झळकावलं होतं. मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. टीम इंडियाला 50 षटकात 240 धावा करण्यात यश आलं. पण ऑस्ट्रेलियाने 43 षटकात चार गडी गमवून 241 धावा केल्या आणि जेतेपदावर नाव कोरलं. या पराभवानंतर विराट कोहलीसह संपूर्ण भारतात निराशेचं वातावरण होतं. आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट कोहली दु:खी झाल्याचं दिसत आहेत.

भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू एका बाजूला जल्लोष करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीच्या चेहऱ्यावर पराभवामुळे निराशा होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही नाराजी स्पष्ट दिसत आहे. विराट कोहली स्टंपजवळ आला नाही आणि आपल्या टोपीने स्टंप पाडताना दिसत आहे. तर दुसरीकडे, रोहित शर्मा मान खाली घालून पुढे जाताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ आतापर्यंत लाखों लोकांनी पाहिला असून त्याखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या जखमा पुन्हा एकदा ओल्या झाल्या आहेत.

35 वर्षीय विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. वनडेत सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही केला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा 49 शतकांचा विक्रमही मोडीत काढला होता. विराट कोहलीने सर्वाधिक 765 धावा केल्याने त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित केलं. आता विराट कोहली 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार की नाही याबाबतची उत्सुकता आहे. कारण 2022 टी20 वर्ल्डकप पराभवानंतर विराट टी20 सामना खेळलेला नाही.