आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये विराट कोहलीचं ‘मिशन 266’! केकेआर, एसआरएच आणि आरआरसाठी धोक्याची घंटा

आयपीएल 2024 स्पर्धेत मोठा उलटफेर करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. आता प्लेऑफच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. विराट कोहलीच्या मिशन 266 स्वरूप देण्याची वेळ आहे. विराट कोहलीने असं केलं तर आरसीबीचं नशिब या पर्वात चमकू शकतं.

आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये विराट कोहलीचं 'मिशन 266'! केकेआर, एसआरएच आणि आरआरसाठी धोक्याची घंटा
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 6:35 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद संघांना अंतिम फेरी गाठण्याची थेट संधी आहे. तर दुसरीकडे, राजस्थान आणि बंगळुरुला अंतिम फेरीसाठी दोनदा सामना करावा लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा एकमेव संघ सोडला तर उर्वरित तीन संघांनी जेतेपदावर नाव कोरलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची झोळी मागच्या 16 पर्वात रितीच आहे. त्यामुळे यंदा आरसीबीकडून जेतेपदाची आस चाहते लावून बसले आहे. वुमन्स प्रीमियर लीगनंतर चाहत्यांच्या आशा वाढल्या आहेत. कारण प्लेऑफपर्यंतचा आरसीबीचा प्रवास एका चमत्कारासारखाच होता. त्यामुळे आरसीबीला जेतेपदापर्यंत तीन संघांना धोबीपछाड द्यावा लागणार आहे. एलिमिनेटर फेरीत राजस्थानशी दोन हात करावे लागतील. त्यानंतर कोलकाता आणि हैदराबाद हे संघ असतील. प्लेऑफमधील करो या मरोच्या लढतीत विराट कोहली 266 मिशन पूर्ण करण्यासाठी उतरेल. विराट कोहलीचं मिशन 266 काय ते नेमकं समजून घेऊयात

विराट कोहलीचं मिशन 266 एक पर्वात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी निगडीत आहे. आयपीएल स्पर्धेतील एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली होती. आता 2024 स्पर्धेतही विराट कोहलीला ही संधी चालून आली आहे. विराट कोहलीने प्लेऑफच्या तीन सामन्यात 266 धावा केल्या हा विक्रम मोडीत काढेल. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता आधीच विरोधी संघांना धडकी भरली आहे. विराट कोहलीने या पर्वात पहिलं शतक ठोकलं होतं. तसेच आतापर्यंत 708 धावा करत ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. त्याच्या आसपासही खेळाडू नाही.

2016 पर्वात त्याने 973 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत काढण्यासाठी 266 धावांची आवश्यकता आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यापूर्वी सहा सामन्यात एका एका संघाला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे विराट कोहलीला 266 धावा करणं काही कठीण नाही. जर विराटने मिशन 266 पार केलं तर मात्र एक आणखी विक्रम प्रस्थापित होईल. तसेच आरसीबीला जेतेपदापासून कोणीही रोखू शकणार नाही.

विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक ठोकलं होतं. त्यामुळे त्याला पुन्हा शतकी खेळी करण्याची संधी प्लेऑफमध्ये चालून आली आहे. बेस्ट स्ट्राईक रेटने त्याने मोठी खेळी केली तर संघाला फायदा होणार आहे. तिन्ही सामन्यात विराट कोहलीने संघाला चांगली सुरुवात करून दिली तर विरोधी संघ बॅकफूटवर जाईल यात शंका नाही. धावांचा पाठलाग करताना तर विराट कोहलीची बॅट आणखीच तळपते त्यामुळे चाहत्यांचा अपेक्षा वाढल्या आहेत.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.