Virat Kohli : विराट कोहलीने सलग दोन सेंच्युरी ठोकत आयपीएलमध्ये रचला इतिहास
IPL 2023 Virat Kohli Hundread : आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोहलीने एकूण 7 शतके केली आहेत. आरसीबीने गुजरातला 198 धावांचं लक्ष्य दिलं असून हा सामना आरसीबीला जिंकणं गरजेचं आहे.
मुंबई : आयपीएलमधील शेवटचा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरू आहे. आरसीबीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याने शानदार शतक ठोकलं आहे. आरसीबीने गुजरातला 198 धावांचं लक्ष्य दिलं आहे. यामध्ये कोहलीचं शतक महत्त्वाचं ठरलं, विराट 101 धावांसह शेवटपर्यंत नाबाद राहिला.
शिख धवन, जोस बटलरनंतर सलग 2 शतक ठोकणारा विराट कोहली तिसरा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोहलीने एकूण 7 शतके केली आहेत तर ख्रिस गेल 6 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 60 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या यामध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
Back to back centuries for Virat Kohli! ? ?
Brings up his 7️⃣th IPL Century! There is no competition! G.O.A.T #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvGT pic.twitter.com/w8xmFqccny
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2023
आयपीएल 2023 मोसमातील पहिलंवहिलं शतक हे सनरायजर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूक याने शतक केलं होतं. त्यानंतर अनुक्रमे वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, प्रभसिमरन सिंह, शुबमन गिल, विराट कोहली आणि हेनरिच क्लासेन, कॅमरुन ग्रीन आणि परत एकदा विराट कोहलीने दुसरं शतक ठोकलं आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (W), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (W), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख