Virat Kohli चं ऐतिहासिक शतक, सचिन तेंडुलकर याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
Virat Kohli Century | विराट कोहली याने आपल्या 35 व्या वाढदिवशी वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करत मोठा कीर्तीमान केला आहे. विराटने दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक करत सचिनच्या विश्व विक्रमाची बरोबरी साधली आहे.
कोलकाता | विराट कोहली याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. विराट कोहली याने आपल्या 35 व्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतील 49 वं शतक ठोकलंय. विराटने 119 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. विराटने यासह सचिन तेंडुलकर याच्या वनडेतील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटने सचिनच्या तुलनेत कित्येक पटीने वेगवान 49 शतकं पूर्ण केली आहेत.
विराटने 121 चेंडूंमध्ये 83.47 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 101 धावा केल्या. विराटने या खेळीत 10 चौकार लगावले. विराटचं या विक्रमी शतकानंतर सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. सचिन तेंडुलकर यानेही विराटचं ट्विट करत कौतुक केलंय. तसेच सारा भारत विराट विराट असा जयघोष करतोय. आता विराटला सचिनचा वनडेतील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याी संधी आहे. टीम इंडिया साखळी फेरीत वर्ल्ड कपमधील आपला अखेरचा सामना हा नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. चाहत्यांना विराटकडून याच सामन्यात शतक ठोकून सचिनचा विक्रम मोडीत काढण्याची आशा आहे.
दरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाला विजयासाठी 327 धावांचं आव्हान दिलंय. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 326 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट व्यतिरिक्त मुंबईकर श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली.
विराटचं 49 वं ऐतिहासिक शतक
4⃣9⃣ 𝙊𝘿𝙄 𝘾𝙀𝙉𝙏𝙐𝙍𝙄𝙀𝙎!
Sachin Tendulkar 🤝 Virat Kohli
Congratulations to Virat Kohli as he equals the legendary Sachin Tendulkar’s record for the most ODI 💯s! 👏#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/lXu9qJakOz
— BCCI (@BCCI) November 5, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन) क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.