IND vs AUS | विराटची फायलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड उध्वस्त

Virat Kohli IND vs AUS | विराट कोहली 13 व्या वनडे वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत धमाकेदार बॅटिंग करत आला आहे. विराटने वर्ल्ड कप फायनलमध्ये रिकी पॉन्टिंगचा रेकॉर्ड उध्वस्त केला आहे.

IND vs AUS | विराटची फायलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड उध्वस्त
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 3:57 PM

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 मध्ये टीम इंडियाने टॉस गमावला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून चेसिंग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर शुबमन 4 धावा करुन आऊट झाला. शुबमननंतर टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि चौथा वर्ल्ड कप खेळत असलेला विराट कोहली मैदानात आला. विराटने मैदानात आल्यानंतर 3 धावा केल्या. या 3 धावांसह विराटने आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात कीर्तीमान केला. विराट अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला.

विराट कोहली आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटने याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटला रिकीचा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 3 धावा हव्या होत्या. विराटने तिसरी धाव घेताच पॉन्टिंगला पछाडलं. यासह आता विराट सर्वात जास्त धावा करणारा एकूण दुसरा आणि पहिला सक्रीय फलंदाज ठरला आहे. तर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर, 2 हजार 278 धावा, 44 डाव.

विराट कोहली, 1 हजार 746 धावा, 37 डाव.

रिकी पॉन्टिंग, 1 हजार 743 धावा, 42 डाव.

विराटचं अंतिम सामन्यात अर्धशतक

दरम्यान विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक ठोकलं. विराटचं हे वर्ल्ड कपमधील सलग पाचवं अर्धशतक ठरलं. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 56 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 89.29 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. तसेच विराटने साखळी फेरीतही ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्धशतक केलं होतं. विराटने तेव्हा 116 चेंडूमध्ये 85 धावांची खेळी केली होती.

विराट कारनामा

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.