युवराज सिंहकडून गोल्डन बूट गिफ्ट, विराट कोहलीचा सिक्सर किंगला हळवा संदेश, म्हणाला ‘जमाना याद करेगा!’

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि विराट कोहली (Virat Kohli) किती चांगले मित्र आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या मैत्रीला सोशल मीडियावर चाहते अनेकदा सलाम करत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची मैत्री पाहायला मिळाली आहे.

युवराज सिंहकडून गोल्डन बूट गिफ्ट, विराट कोहलीचा सिक्सर किंगला हळवा संदेश, म्हणाला 'जमाना याद करेगा!'
Virat Kohli - Yuvraj Singh
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 2:33 PM

मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि विराट कोहली (Virat Kohli) किती चांगले मित्र आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या मैत्रीला सोशल मीडियावर चाहते अनेकदा सलाम करत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची मैत्री पाहायला मिळाली आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे (Virat Kohli Post) युवराज सिंगला सलाम केला आहे. खरं तर, मंगळवारी युवराज सिंगने विराट कोहलीला गोल्डन बूट भेट म्हणून दिले आणि एक अतुलनीय कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याचे वर्णन केले. युवराजच्या त्या पोस्टनंतर आता विराट कोहलीने सिक्सर किंगला उत्तर दिले आहे. विराट कोहलीने युवराज सिंगसोबतचा फोटो पोस्ट करत एक हळवा संदेश पोस्ट केला आहे.

विराट कोहलीने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘धन्यवाद युवी पा, (दादा) मला पहिल्या दिवसापासून खेळताना पाहणाऱ्याने अशा भावना व्यक्त केल्या आहेत. याला खूप मोठा अर्थ आहे. तुमचे जीवन आणि तुम्ही कर्करोगाला हरवून पुनरागमन करणे केवळ क्रिकेटसाठीच नव्हे तर सर्व स्तरातील लोकांसाठी प्रेरणादायी होते आणि राहील. तुम्ही काय आहात हे मला माहीत आहे. तुम्ही नेहमीच खूप उदार आहात आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेता. आता आपण दोघेही वडील झालो आहोत मी या नवीन प्रवासात तुम्हाला खूप आनंद मिळावा अशा शुभेच्छा देतो. रब (ईश्वर) तुझं भलं करो.

मंगळवारी युवराज सिंगने विराट कोहलीसाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. युवराज सिंगने लिहिले होते, ‘विराट कोहली… मी तुला क्रिकेटर आणि माणूस म्हणून मोठा होताना पाहिले आहे. भारतीय क्रिकेटमधल्या महान खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून चालणारा तरुण आज स्वतः एक महान खेळाडू झाला आहे. तुझी शिस्त, उत्साह आणि मैदानावरील योगदान या देशातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे, जो एक दिवस निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहतो.

इतर बातम्या

IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?

ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट

IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.