सामना सुरु असताना विराट कोहलीने असं काय केलं की रियान परागला बसला आश्चर्याचा धक्का, पाहा Video
श्रीलंकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात करून पुढची गाडी रुळावरून घसरली. पण या सामन्यातील विराट कोहली एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात विराट कोहली काही खास करू शकला नाही. पहिल्या वनडेसारखा दुसऱ्या वनडे फ्लॉप ठरला. पहिल्या सामन्यात 24 धावा केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात 14 धावा केल्या. पण विराट कोहली मैदानात काही ना काही करून लक्ष वेधून घेत असतो. दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच काय तर बेंचवर बसलेल्या रियान परागलाही आश्चर्याचा धक्का बसला. भारताच्या फिल्डिंगवेळी हा प्रकार घडला. श्रीलंका फलंदाजी करत असताना 27 वं षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल आला होता. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाने उंच फटका मारला. पण मैदानाच्या आतच राहिला. कव्हरवर उभ्या असलेल्या विराट कोहलीने जराही चूक न करता झेल पकडला. हा झेल पकडताच त्याने अनोख्या अंदाजात सेलीब्रेशन केलं.
विराट कोहली झेल घेतल्यानंतर डग आऊटच्या दिशेने फिरला आणि आसामी डान्सची स्टेप केली. त्याचं हे सेलीब्रेशन पाहून रियान परागलाही हसू आलं. रियान पराग हा आसामधून येतो. तसेच आयपीएलमध्ये झेल पकडल्यानंतर अशा पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसला आहे. दरम्यान, विराट कोहलीने वनडे वर्ल्डकपनंतर पहिली वनडे मालिका खेळत आहे. आता खेळलेल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याने 32 चेंडूत 24 आणि 19 चेंडूत 14 धावा केल्या. टी20 मध्ये खेळणाऱ्या रियान परागला अजूनही वनडे संधी मिळालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात संधी मिळेल की नाही यातही शंका आहे.
Can never get enough of Kohli’s celebrations 🕺
The Axar-Virat duo fetches India another wicket!
Watch #SLvIND 2nd ODI LIVE NOW on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/YF6eW6E7Di
— Sony LIV (@SonyLIV) August 4, 2024
श्रीलंकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतल्याने टीम इंडियावर दडपण असणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावा दिल्या. भारताने 42.2 षटकात सर्वबाद 208 धावा केल्या. श्रीलंकेने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा वनडे सामना 7 ऑगस्टला होणार आहे.