मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग IPL 2022 मध्ये खराब फॉर्म विराट कोहलीची (Virat Kohli) पाठ सोडत नाहीय. तीन वेळा विराट गोल्डन डक म्हणजे शुन्यावर आऊट झालाय. शुक्रवारी पंजाब किंग्स (Punjab kings) विरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतर विराट फक्त 20 धावाच करु शकला. पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 54 धावांनी पराभूत केलं. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट पहायला मिळाली. आरसीबीचा डाव सुरु झाला होता. त्यावेळी एक काळी मांजर (Black cat) साइट स्क्रीनवर जाऊन बसली. डावाच्या पहिल्याच षटकात हे घडलं, जेव्हा विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस क्रीझवर होते. ती काळी मांजर पाहून डू प्लेसिस चकीत झाला. काळी मांजर काही वेळ स्क्रीन समोर बसून होती. त्यामुळे काही वेळासाठी खेळ थांबला होता. मांजर काही वेळाने तिथून निघून गेली. त्यानंतर सामना सुरु झाला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दरम्यान काही नेटीझन्सनी विराट कोहलीला ट्रोल केलं.
That black cat evil magic was planted. #IPL
हे सुद्धा वाचा— cricBC (@cricBC) May 13, 2022
— Varma Fan (@VarmaFan1) May 13, 2022
Dear #Kohli , if you want to prevent evil eyes , either you stop posting workouts on twitter or else adopt a Black cat #IPL #IPL2022 #RCBvsPBKS #RCBvPBKS pic.twitter.com/x4innvWIlp
— cricketistan (@cricketisthan) May 13, 2022
I think this black cat is the reason for the lack of form of @imVkohli it showed itself today. #RCBvsPBKS #PKBSvsRCB #IPL #ViratKohli @RCBTweets pic.twitter.com/OgG2MUa6Pr
— Dr Nirmal Jyothi (@majornirmal) May 13, 2022
एका युजरने विराट कोहलीला सल्ला दिलाय. “डियर कोहली, तुम्हाला वाईट नजर लागू नये, असं वाटत असेल, तर तुम्ही टि्वटरवर तुमचे वर्कआऊटचे व्हिडिओ, फोटो शेअर करण बंद करा, किंवा ही काळी मांजर पाळा” ‘काळी मांजर काळ्या जादूसाठी वापरतात’ असं एका युजरने लिहिलय. “मला वाटतं काळी मांजरच विराट कोहलीच्या खराब फॉर्मच कारण आहे. आज हे सिद्ध झालं” असं एका युजरने लिहिलय.
मुंबईच्या ब्रबॉर्न स्टेडियमवर ही लढत झाली. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 54 धावांनी विजय मिळवला. RCB चा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला. PBKS ने आरसीबीला विजयासाठी 210 धावांचे टार्गेट दिले. पण आरसीबीने निर्धारित 20 षटकात 9 बाद 155 धावा केल्या. या विजयासह पंजाबने महत्त्वाचे दोन पॉइंटस घेतले. पंजाबचे प्लेऑफ मधील आव्हान अद्यापही टिकून आहे. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. रजत पाटीदारने 26 आणि विराट कोहलीने 20 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. पंजाबच्या गोलंदाजांनी आज अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जॉनी बेयरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे दोन पंजाबच्या विजयाचे नायक ठरले.