Video : राहुल द्रविड कुबड्यांची मदत घेत मैदानात आला आणि विराट कोहलीने लगेच घेतली धाव, केलं असं की…

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला. या सामन्यानंतर राहुल द्रविड आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : राहुल द्रविड कुबड्यांची मदत घेत मैदानात आला आणि विराट कोहलीने लगेच घेतली धाव, केलं असं की...
राहुल द्रविड आणि विराट कोहली
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 14, 2025 | 5:42 PM

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दुखापत झाली होती. त्यामुळे मैदानात कसं उतरणार याची चिंता होती. पण राहुल द्रविड व्हीलचेअरच्या मदतीने मैदानात उतरत आहे. राहुल द्रविड प्रत्येक सामन्यात त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दिसत आहे. खेळाडूंसोबत वेळ घालवतो. आयपीएल स्पर्धेत रविवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने राजस्थानला सहज पराभूत केलं. या सामन्यानंतर राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक हस्तांदोलन करत होते. असं करण्याची एक जुनी प्रथा आहे. यावेळी राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्यात घडलेला प्रसंग कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

राहुल द्रविड दुखापतग्रस्त असूनही कुबड्यांच्या मदतीने मैदानात आला. यावेळी राहुल द्रविड खेळाडूंना हस्तांदोलन करण्यासाठी कुबड्यांच्या मदतीने पुढे जात होता. तेव्हा राहुल द्रविडची ही धडपड पाहून विराट कोहली पुढे सरसावला. त्याने द्रविडला तिथेच थांबण्याचा सल्ला दिला. त्याच्या हावभावावरून स्पष्ट दिसत होतं की तो त्यांना सांगत असेल की ‘तू इथे का आलास? इतकं चालत जाऊ नकोस. इथेच उभा राहा ते येतील.’ पण इतकं सांगूनही राहुल द्रविड पुढे सरसावला आणि त्याने खेळाडूंशी हस्तांदोलन केलं. चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच भावला असून ते विराट कोहलीचं कौतुक करत आहेत.

सामना सुरु होण्यापूर्वीही विराट कोहली आणि राहुल द्रविडचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. सामन्यापूर्वी सराव सुरु असताना राहुल द्रविड व्हीलचेअरवरून मैदानात आला. तेव्हा विराट कोहलीने गुडघ्यावर बसून द्रविडला मिठी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत राहुल द्रविडकडे राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा आहे. पण आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जयनगर क्रिकेटर्स विरुद्ध विजय क्रिकेट क्लब सामन्यात खेळताना द्रविडला दुखापत झाली. द्रविडने 66 चेंडूत 43 धावांची खेळी केली. दुखापत होत असूनही त्याने ही खेळी केली.