रणजी स्पर्धेत विराटचं होणार नुकसान, किंग कोहलीला मिळणार फक्त इतके पैसै
विराट कोहली 12 वर्षानंतर पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. पण या स्पर्धेत त्याचं आर्थिक नुकसान होमआर आहे. कारण त्याला इतर खेळाडूंच्या तुलनेत कमी पैसे मिळतील. पण याच जागी त्याने एखादा आंतरराष्ट्रीय सामना खेळला तर जास्त पैसे मिळतील. चला जाणून घेऊयात काय आर्थिक नुकसान होईल ते..
![रणजी स्पर्धेत विराटचं होणार नुकसान, किंग कोहलीला मिळणार फक्त इतके पैसै रणजी स्पर्धेत विराटचं होणार नुकसान, किंग कोहलीला मिळणार फक्त इतके पैसै](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Virat_Kohli_Test.jpg?w=1280)
विराट कोहलीची बॅट गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शांत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक ठोकलं. पण त्यानंतर त्याचा फॉर्म जैसे थे होता. बाहेरच्या चेंडूला बॅट लावून विकेट देऊन त्याला तंबूत पाठवलं जात होतं. त्यामुळे त्याचं संघात स्थान राहतं की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. यासाठी विराट कोहलीने रणजी क्रिकेटमधून पुन्हा एकदा आपल्या बॅटला धार लावण्याचा प्रयत्ना आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धेत 12 वर्षानंतर कमबॅक करणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गमवलेला फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये हात आजमावत आहे. पण या सामन्यात त्याला मोठं आर्थिक फटका बसणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला एका सामन्यासाठी लाखो रुपये सामना फी मिळते. पण त्या तुलनेत त्याला रणजी ट्रॉफी स्पर्धेत पैसे मिळणार आहे. चला जाणून घेऊयात विराट कोहलीला किती पैसे मिळणार ते..
रणजी स्पर्धेत जे खेळाडू 40 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत त्यांना दिवसाला 60 हजार रुपये मिळतात. रणजी स्पर्धत साखळी फेरीचा एक सामना 4 दिवसांचा असतो. तर बाद फेरीत पाच दिवसांपर्यंत सामना चालतो. त्यामुळे पूर्ण सामन्यासाठी 2 लाख 40 हजार फी मिळते. इतकाच अनुभव असलेल्या राखीव खेळाडूला बेंचवर बसल्या बसल्या दिवसाचे 30 हजार मिळतात. तर 20 ते 40 दरम्यान सामने खेळलेल्या खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली असेल तर प्रत्येक दिवसाचे 50 हजार रुपये मिळतात. तर राखीव खेळाडूला 25 हजारापर्यंत फी दिली जाते. विराट कोहली आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 23 सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक दिवसाचे 50 हजार रुपये मिळतील. म्हणजेच चार दिवसांसाठी त्याला 2 लाख रुपये मिळू शकतात.
विराट कोहली रणजी स्पर्धेत दिल्ली संघाकडून मैदानात उतरणार आहे. 30 जानेवारीला दिल्ली विरुद्ध रेल्वे सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होणार आहे. विराट कोहली बीसीसीआयच्या ए+ ग्रेड खेळाडू आहे. त्याला बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. तर खेळाडूंना टी20, वनडे आणि कसोटीसाठी वेगवेगळी फी मिळते. यात एका टेस्टसाठी बीसीसीआय 15 लाख, वनडेसाठी 6 लाख आणि टी20साठी 3 लाख रुपये फी देते.
विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दित 23 रणजी सामने खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 50 हून अधिक च्या सरासरीने त्याने 1574 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 शतकं ठोकली आहे. विराट कोहली दिल्लीसाठी शेवटचा रणजी सामना नोव्हेंबर 2012 मध्ये खेळला होता. तेव्हा त्याने दोन्ही डावत मिळून 57 धावा केल्या होत्या.