बांग्लादेश कसोटीदरम्यान विराट कोहली घेणार रोहित शर्माची मुलाखत! पहिलाच प्रश्न असा विचारणार Watch Video

भारत बांग्लादेश कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या मुलाखतीतील एक भाग समोर आला आहे यात रोहित शर्माची मुलाखत घेणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. तसेच पहिला प्रश्नही तयार ठेवल्याचं सांगितलं आहे.

बांग्लादेश कसोटीदरम्यान विराट कोहली घेणार रोहित शर्माची मुलाखत! पहिलाच प्रश्न असा विचारणार Watch Video
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 3:38 PM

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मुलाखत समोर आली आहे. या दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. या मुलाखतीत दोघांनी दिलखुलासपणे आपलं म्हणणं मांडलं. गौतम गंभीरच्या मुलाखतीवरच विराट कोहलीचं भागलं नाही. विराट कोहलीचा पुढचा गेस्ट हा रोहित शर्मा असणार आहे. या बाबतचा खुलासा विराट-गंभीर मुलाखतीत झाला. गौतम गंभीरने आपल्या मुलाखतीच्या शेवटी विराट कोहलीला विचारलं की, पुढचा गेस्ट रोहित शर्मा असणार आहे. कर्णधार रोहित शर्माला पहिला प्रश्न काय विचारणार? असं गौतम गंभीरने विचारलं. विराट कोहलीचा हा प्रश्न आपसूकच त्याच्या विसरभोळेपणावर असणार आहे. विराट कोहलीने सांगितलं की, माी त्याला पहिला प्रश्न विचारणार की सकाळी उठल्यावर भिजलेले बदाम खातो की नाही? रोहित शर्मासोबत मुलाखतीबाबत विराट आणि गंभीर यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ समोर आला आहे.

रोहित शर्माला बदाम खातो की नाही हा प्रश्न विचारणार असल्याचं ऐकून गौतम गंभीरने त्यात आणखी एक भर घातली. गौतम गंभीरने सांगितलं की, ‘ त्याला विचार की सकाळी 11 ऐवजी रात्री 11 वाजता का आला?’ असा हसतखेळत विराट कोहली आणि गौतम गंभीरची मुलाखत संपली. विराट कोहलीने बदाम खाण्याबाबतचा प्रश्न विचारणं सहाजिकच आहे. कारण रोहित शर्माला विसरण्याची सवय आहे. रोहित शर्मा मोबाईल, पासपोर्ट, घड्याळ या सारख्या वस्तू अनेकदा विसरला आहे. भिजलेला बदाम खाल्याने बुद्धीला चालना मिळते, तर आठवण चांगली राहते असं म्हंटलं जातं.

कर्णधार रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से समोर आले आहे. एकदा तर रोहित शर्मा एंगेजमेंट रिंग विसरला होता. अचानक त्याला सहकारी मित्राच्या हातातील रिंग पाहून आठवण आली आणि शोधाशोध सुरु झाली. इतकंच काय, रोहित शर्मा नाणेफेकीवेळी अनेकदा नेमकं काय घ्यायचं आहे हे देखील विसरला आहे.  त्यामुळे रोहित शर्माचा विसरभोळेपणा हा सर्वश्रूत आहे. विराट कोहलीनेही त्याच्या मुलाखतीत अनेकदा याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.