Virat Kohali : दुसऱ्या वनडेतून विराट कोहली बाहेर जाणार? तिसऱ्या टी-20 सामन्यात दुखापत, कामगिरीचं टेन्शन आणि चाहत्यांचा रोषही
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यातील धडाकेबाज भागीदारी आणि त्याआधी जसप्रीत बुमराहने घेतलेल्या सहा विकेट्समुळे टीम इंडियाने केनिंग्टन ओव्हल येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला.
नवी दिल्ली : पाठीच्या दुखापतीमुळे मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG )पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडलेला विराट कोहली (Virat Kohali) दुसऱ्या वनडेतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ANI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट अद्याप पाठीच्या दुखापतीतून बरा झालेला नाही आणि गुरुवारच्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी तो येणार नसल्याचं कळतंय. आधीच सुमार कामगिरी करून चाहत्यांच्या रोषाला विराटला सामोरं जावं लागलंय. तर दुसरीकडे त्याच्या कामगिरीवरचं त्याला टेन्शन आलंय. त्यामुळे असं दुहेरी नव्हे तर तिहेरी टेन्शन आल्यानं विराट दुसऱ्या वनडेसाठी खेळणार नाही,अशी देखील शक्यता व्यक्त केली जातेय. यापूर्वी विराटला चाहत्यांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. तर एका दिग्गज माजी क्रिकेटपटूनंही विराटच्या कामगिरीविषयी चिंता व्यक्त केली होती.
बीसीसीआयनं काय म्हटलंय?
मंगळवारी फलंदाज श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटच्या जागी केनिंग्टन ओव्हलवर संधी मिळाली. पहिल्या सामन्यापूर्वी बीसीसीआयनं ट्विटरवर लिहिलं की, ‘विराट कोहली आणि अर्शदीप सिंग इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी निवडीसाठी उपलब्ध नाहीत. विराटला पाठीचा थोडासा ताण आहे, तर अर्शदीपला पोटाची समस्या आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक खेळाडूंचं निरीक्षण करत आहे. त्यांची काळजी घेतली जातेय,’
सामन्यात काय झालं?
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यातील धडाकेबाज भागीदारी आणि त्याआधी जसप्रीत बुमराहने घेतलेल्या सहा विकेट्समुळे टीम इंडियाने केनिंग्टन ओव्हल येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला. रोहितने 58 चेंडूत 76 धावा केल्या तर शिखरने 54 चेंडूत 31 धावा केल्याने मेन इन ब्लू संघाने केवळ 18.4 षटकात 111 धावांचे लक्ष्य पार केले.
उद्या दुसरा सामना
दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी 14 जुलै रोजी लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवला जाईल.या सामन्यातही विराट कोहली खेळणार नाही, असं बोललं जातंय.अशाप्रकारे, टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे, कारण सर्वांना माहित आहे की तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे.गेल्या काही काळापासून त्याची बॅट थंड असली तरी विराट कोहलीची प्रतिभा सर्वांनाच माहिती आहे.