वीरेंद्र सेहवागचा हिंडनबर्गच्या अहवालावर गंभीर आरोप; म्हणाला, गोऱ्यांना..

| Updated on: Feb 06, 2023 | 7:58 PM

हिंडनबर्ग संशोधन संस्थेने एक अहवाल सादर केला आणि होत्याचं नव्हत झालं. जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेले अदानी समुहाचे गौतम अदानी डायरेक्ट टॉप-20 मधूनही बाहेर झाले. अशातच भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने यावर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

वीरेंद्र सेहवागचा हिंडनबर्गच्या अहवालावर गंभीर आरोप; म्हणाला, गोऱ्यांना..
Follow us on

मुंबई : हिंडनबर्ग संशोधन संस्थेने एक अहवाल सादर केला आणि होत्याचं नव्हत झालं. जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेले अदानी समुहाचे गौतम अदानी डायरेक्ट टॉप-20 मधूनही बाहेर झाले. अहवाल वाऱ्यासारखा पसरला होता तर दुसरीकडे अदानींचे 12 शेअर्स दहा ते बारा दिवसांमध्ये 12 टक्क्यांनी घसरले. या प्रकरणाचे पडसाद संसदेतही दिसले कारण विरोधकांनी यावरून सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. अशातच भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने यावर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सेहवाग?
गोऱ्यांना भारतीयांची प्रगती सहन होत नाही. आताची शेअर मार्केटमध्ये जी काही पडझड होत आहे, हे सर्व एक हुशारीने नियोजन करत केलेलं षडयंत्र असल्याचं म्हणत वीरेंद्र सेहवागने गंभीर आरोप केला आहे. इतकंच नाहीतर, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण भारत पुन्हा उभा राहिल, असंही सेहवानने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा थेट परिणाम होणार असा अंदाज अनेकांनी लावलाय. अदानींनी खरच काही अफरातफर केली आहे का? असे अनेक सवाल सर्वांना पडले आहेत. हिंडनबर्ग एखाद्या गुप्तहेर संस्थेसारखं काम केलं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे सर्व चालू असल्याचं बोललं जात आहे. अदानी समूहातील काही अधिकाऱ्यांसोबत त्यांनी ओळख केली आणि त्यांच्याकडील प्रत्येक कागदाची शहानिशा केली. त्यानंतर हा रिपोर्ट सर्वांसमोर आणल्याच्या चर्चा आहेत.

 

दरम्यान,  वीरेंद्र सेहवागचं हे ट्विट जोरदार व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.  गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर बाजारात येणार असणारा 20 हजार कोटींचा FPO अदानी समूहाने लांबणीवर ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गुंतवणूकदारांचे पैसे माघारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन आठवड्यांपासून हे प्रकरण तापलं असून जवळपास 44 टक्क्यांहून अदानी समूहाचे शेअर्स पडले आहेत.