AUS vs AFG : मॅक्सवेलने सामना जिंकवला पण ‘या’ खेळाडूचाही विजयात सिंहाचा वाटा, विरेंद्र सेहवागचं ट्विट व्हायरल!
Virender Sehwag on AUS vs AFG Match : ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात कांगारूंची इज्जत वाचवण्याचं काम मॅक्सवेलने केलं. त्यासोबतच आणखी एका खेळाडूचा मोठा वाटा आहे. हे सेहवागने हेरत त्याबाबत ट्विट केलंय.
मुंबई : वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात कांगरूंनी ग्लेन मॅक्सवेल याच्या द्विशतकी खेळीच्या दमावर 3 विकेटने सामना जिंकला. या सामन्यामध्ये इब्राहिम जादरान याच्या 129 धावांच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया संघाला 292 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलिया संघाच्या एकवेळ 91 ला सात विकेट गेल्या असताना तिथून 292 धावा चेस करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याबाबत बोलताना माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने विजयामध्ये गेमचेंझर ठरलेल्या मॅक्सवेलचाच नाहीतर दुसऱ्या खेळाडूचाही विजयात सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाला सेहवाग?
लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलचं द्विशतक हे वन डे क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळीपैकी एक आहे. अनेक दिवस ते लक्षात राहिल, त्याला कर्णधार पॅट कमिन्सनेही महत्त्वाची साथ दिल्याचं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. सेहवागने यासंदर्भात ट्विट केलं आहे. मॅक्सवेलने सामना जिंकवला असला तरी दुसरीकडून त्याला पॅट कमिन्सने त्याला चांगली साथ दिली. तब्बल 68 बॉल खेळले आणि अवघ्या 12 धावा जरी त्याने केल्या असल्या तरी तो मैदानावर एका बाजूला उभा होता हे महत्त्वाचं होतं. कारण बॉल डॉट गेले तरी हिटिंगने मॅक्सवेल त्याचं काम करत होता.
सेहवागचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीसुद्धा पॅट कमिन्सचं विशेष कौतुक केलं आहे. कारण मॅक्सवेलला कोणत्याच मुख्य फलंदाजाने साथ दिली नाही. कांगारूंच्या एकालाही 30 धावा करता आल्या नाहीत.
सेहवागंचं ट्विट
Saw this coming. 200 in a run-chase, One of the all time great one day innings by Maxwell. @Gmaxi_32 was a man possessed and great support by @patcummins30 . An innings to remember for a long long time . #AUSvsAFG https://t.co/ClOM3NdSJf pic.twitter.com/nQ8uNVh1af
— Virender Sehwag (@virendersehwag) November 7, 2023
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.