Ind vs zim : शून्यावर आऊट झालेल्या अभिषेकला कोच लक्ष्मण एकच वाक्य बोललेला, पुढच्या मॅचमध्ये शतकच ठोकलं

झिम्बाब्वेविरूद्ध वादळी शतकी खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माच्या शतकाआधी काय घडलं होतं ते समोल आलं आहे. कारण पहिल्या सामन्यात अभिषेक शून्यावर आऊट झालेला होता. त्यानंतर कोच लक्ष्मण असं काय बोलला की त्यानंतर अभिषेकने शतक ठोकलं, जाणून घ्या.

Ind vs zim : शून्यावर आऊट झालेल्या अभिषेकला कोच लक्ष्मण एकच वाक्य बोललेला, पुढच्या मॅचमध्ये शतकच ठोकलं
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 5:54 PM

झिम्बाब्वेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने 100 धावांनी विजय मिळवला. या सामन्याध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्सप्रमाणे प्रदर्शन केलं. कारण टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतरच्या पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेकडून मानहानिकारक पराभव झाली. युवा टीम इंडिया ट्रोल झाली. दुसऱ्या सामन्यात जखमी वाघासारखे झिम्बाब्वेवर टीम इंडियाचे खेळाडू तुटून पडले. या मालिकेमधून पदार्पण करणारा युवा खेळाडू अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची कातडी काढली. पठ्ठ्याने सर्वात वेगवान शतक करण्याच्या यादीत जागा मिळवली. आयपीएलमध्येही त्याने अशा अनेक आक्रमक खेळी केल्या आहेत. मात्र हाच अभिषेक पहिल्या सामन्यात शून्यावर आऊट झाल्यावर त्याच्यावर टीका होत होती. पण कोच लक्ष्मणने त्याला एकच गोष्ट सांगितली आणि दुसऱ्या मॅचमध्ये शतकी खेळी केली.

पहिल्या टी-20 मध्ये फेल गेल्यावर अभिषेकने कर्णधार शुबमन गिल आणि कोच लक्ष्मण यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी लक्ष्मणने सांगितलं की, आयपीएलमध्ये तू आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना फोडून काढत होतास. त्यामुळे हा सामनाही आयपीएलसारखा आहे असं समज आणि खेळ. तु तुझा मैदानात वेळ घे परिस्थितीशी जुळवून घे त्यानंतर तुला कोणीच थांबवू शकणार नाही, असं अभिषेक शर्मा याचे वडील राजकुमार शर्मा यांनी सांगितलं.

शुबमन गिल आणि अभिषेक हे पंजाबकडून अंडर 14 मध्ये ओपनिंगला खेळले होते. आता दोघे परत एकदा ओपनिंगला येता आहेत. दोघे आक्रमक ओपनिंग देऊ शकतात आणि टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून देतील, असंही राजकुमार शर्मा म्हणाले.

अभिषेक शर्माने 47 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले होते. सोशल मीडियावर रोहित शर्मा गेल्यावर त्याची जागी युवा अभिषेक शर्माने घतल्याचं चाहते कमेंटमध्ये बोलत आहेत. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेडसोबत फलंदाजीला येणारा अभिषेक टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज होऊ शकतो. त्यासोबतच तो बॉलिंगही टाकतो त्यामुळे कॅप्टनला वेळ पडली तर त्याचा  पर्यायही खुला असणार आहे.

तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.