Ind vs Eng | इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून ‘त्रिदेव’ मैदानात उतरण्याची शक्यता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Ind vs Eng | इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून 'त्रिदेव' मैदानात उतरण्याची शक्यता
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 9:17 PM

मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात (Team India) तर इंग्लंडने श्रीलंकेविरोधात (England vs Sri Lanka) त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. यामुळे इंग्लंड आणि टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे. अवघ्या काही दिवसांपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (England Tour India) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतग्रस्त असल्याने त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. यामुळे या मालिकेत रवीचंद्रन अश्विनसोबत (Ravichandran Ashwin) अक्षर पटेल (Axar Patel), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washngton Sundar) या तिघांपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. (Washington Sundar Akshar Patel and Kuldeep Yadav are likely to get a chance for the Test series against England)

वॉशिंग्टन सुंदरचं प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित मानलं जात आहे. कारण तो ऑलराऊंडर आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात शानदार कामगिरी केली होती. चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात सुंदरने शार्दुल ठाकूरसह सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने अर्धशतक लगावले. त्याने एकूण 62 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी 22 धावा केल्या. तसेच गोलंदाजीने पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकूण 4 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे त्याला संधी मिळण्याती दाट शक्यता आहे. तसेच अक्षर पटेलला संधी मिळाल्यास त्याचे कसोटी पदार्पण ठरेल.

कुलदीप यादव टीम इंडियाच्या प्रमुख फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरोधातील एकही सामन्यात संधी मिळाली नव्हती. यामुळे टीम मॅनेजमेंट इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत कुलदीपला संधी देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(Washington Sundar Akshar Patel and Kuldeep Yadav are likely to get a chance for the Test series against England)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.