IND vs AUS : फायनलमध्ये रोहितची ती चाल टीम इंडियावरच उलटली, वसीम अक्रमचं वर्मावर बोट

World Cup Final 2023 : वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यामध्ये भारताचा झालेला पराभव सर्व जगाने पाहिला. करोडो भारतीयांचं स्वप्न भंगलेलं, अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा फायनलमधील पराभव धक्कादायक होता. रोहितची एक चाल त्याच्यावर उलटल्याचं पाकिस्तानच्या माजी खेळाडूने म्हटलं आहे.

IND vs AUS : फायनलमध्ये रोहितची ती चाल टीम इंडियावरच उलटली, वसीम अक्रमचं वर्मावर बोट
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 7:47 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारताचा पराभव प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागलाय, कांगारूंनी 2003 च्या पराभवाचाही बदला घेऊ दिला नाही. या सामन्याचा असा काही निकाल लागेल कोणीच विचारही केला नाही. कारण भारताने सलग दहा सामने जिंकत वर्ल्ड कपचे प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र ऐनवेळी सगळी गणित कोलमडलीत, याचाच धागा पकडत पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने रोहित शर्माचा डाव फसल्याचा दावा केला आहे.

वसीम अक्रम काय म्हणाला?

भारतीय संघ बॉलिंगला उतरला तेव्हापासूनच दबावात दिसत होता. रोहित शर्माने सुरूवातीला मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडे सुरूवातीच्या बॉलिंगची जबाबदारी दिलेली, मात्र फायनल सामन्यामध्ये मोहम्मद शमीला दुसरी ओव्हर दिली. शमीने डाव्या हाताच्या फंलंदाजांना आऊट केलं होतं. पण मला वाटतं की बॉल स्विंग होतो म्हणून रोहितने सिराजला सुरूवातीच्या दोन ते तीन ओव्हर द्यायला हव्या होत्या, असं वसीम अक्रम याने म्हटलं आहे.

मोहम्मद सिराज याला सुरूवातीच्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नसती तर त्या जागी शमीला ओव्हर द्यायची होती. तसंही मोहम्मद शमीने सात ओव्हरमध्ये एक विकेट घेतली असून 47 धावा दिल्या. सिराजलाही शेवटला विकेट मिळाल्याचं म्हणत वसीम अक्रम याने रोहितचा तो डाव फसल्याचं म्हटलं आहे. परंतु सुरूवातीलाच विकेट घेत ऑस्ट्रेलिया संघाला बॅकफूटवर ढकलण्याचा रोहितचा प्लॅन असावा.

रोहितने केलेल्या प्लॅनिंगनुसार त्याला विकेट मिळाल्याही मात्र ट्राविस हेड आणि लाबुशेन यांनी चिकट फलंदाजी केली. कोणत्याच गोलंदाजाला यश मिळवू दिलं नाही, जर त्यांच्यापैकी एक जण गेला असता तर सामन्यामध्ये भारताने आणखी जोरात कमबॅक केलं असतं मात्र तसं काही झालं नाही. परंतु शेवटच्या सामन्यातील पराभव विसरणं कोणत्याच भारतीयासाठी सोपं नव्हतं.

वर्ल्ड कप साठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा , शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.