VIDEO: काय तो वेग, काय ती विकेट, 2022मधील आतापर्यंतची सर्वात वेगवान चेंडूवरील विकेट, जॉनी बेअरस्टोचा व्हिडीओ पाहा
Johnny Bearstone Wicket : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात बेअरस्टोला खातेही उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोरखियानं त्याची शिकार केली. मैदानातील तो क्षण पाहा...
नवी दिल्ली : मैदान लॉर्ड्सचं. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात सामना आणि क्रिकेट (Cricket) खेळाचा लांबलचक स्वरूप म्हणजे कसोटी. आता या कसोटीली एका विकेटची चर्चा रंगली आहे. काल उभय संघांमधील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं प्रभावित झाला. नियोजित वेळेपूर्वी खेळ थांबवावा लागला. पण, हे घडेपर्यंत इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये होता. त्यापैकी एक जॉनी बेअरस्टो (Johnny Bearstone) हा इंग्लंडचा खेळाडू होता . बेअरस्टो सुपर फॉर्ममध्ये धावत होता. शेवटच्या 5 डावांपैकी 4 डावात शतके झळकावली. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने त्याची शिकार केली होती . एनरिक नोरखियाचे नाव सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये समाविष्ट आहे. दरम्यान, जॉनीची चर्चा सध्या का सुरू आहे, त्याविषयी अधिक जाणून घ्या…
केवळ जॉनी बेअरस्टोलाच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे चांगले ठाऊक होते की, यावेळी इंग्लंड संघात जर कोणी फलंदाज सर्वात हॉट फॉर्ममध्ये असेल तर तो जॉनी बेअरस्टो आहे. आता जेव्हा एखादा खेळाडू त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असतो तेव्हा त्याला बाहेर काढण्याची ताकदही त्याच्यात असायला हवी आणि एनरिक नोरखियाने हे काम आपल्या मोठ्या ताकदीने केले.
हा व्हिडीओ पाहा
View this post on Instagram
वेगवान गोलंदाजीचा फायदा
जॉनी बेअरस्टो क्रीझवर येताच दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने आपल्याच गतीनं आक्रमण केले. बेअरस्टोची नजर अजूनही विकेटवर स्थिरावलेली नसल्याने रणनीती चांगली होती आणि त्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेलाही मिळाला. जॉनी बेअरस्टो खातेही न उघडता 5 चेंडूंचा सामना केल्यानंतर क्लीन बोल्ड झाला. पहिल्या डावातील इंग्लंडला हा पाचवा धक्का होता.
बेअरस्टोच्या विकेटविषयी…
बेअरस्टोने कसोटी क्रिकेटमधील शेवटच्या 5 डावांपैकी 4 डावात शतक केले होते. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याच्या नावासमोर शून्य लिहिले होते. येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेअरस्टोचे बेल्स ज्या वेगाने उडले ते चेंडूचा वेग नाही. खरं तर, तो चेंडू या वर्षीच्या कसोटीत टाकलेला सर्वात वेगवान चेंडू होता ज्यावर विकेट पडली. एनरिक नॉर्खियाने ज्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली तो 93mph वेगाने फेकला गेला. म्हणजेच, जर तुम्ही ते किलोमीटरमध्ये मोजले तर त्याचा वेग 150 किमी प्रतितास होता. या वर्षातील आतापर्यंतचा कसोटीतील हा सर्वात जलद विकेट घेणारा चेंडू आहे. यामुळे या चेंडूची चर्चा रंगली आहे.