WAUS vs WIND 2nd Odi : Megan Schutt चा ‘पंजा’, टीम इंडिया 100 धावांवर ढेर
Australia Women vs India Women 1st Odi : वूमन्स टीम इंडियाचे फलंदाज पहिल्याच एकदिवसीय सामन्यात फ्लॉप ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 100 धावांवर गुंडाळलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने निराशा केली आहे. वूमन्स टीम इंडियाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर ढेर झाले आहेत. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र एकाही भारतीय फंलदाजाला मैदानात घट्ट पाय रोवून मोठी खेळी करता आली नाही. इतकंच काय पूर्ण 50 ओव्हर सोडा 35 षटकंही निट खेळता आली नाहीत. ऑस्ट्रेलिया वूमन्सने टीम इंडियाचा डाव 34.2 षटकांमध्ये 100 धावांवर गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 101 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियासाठी मेगन शूट हीने सर्वाधिक 5 विकेट्स घेत टीम इंडियाचं कंबरडं मोडलं. तर इतरांनी तिला चांगली साथ दिली.
टीम इंडियाकडून फक्त चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. टीम इंडियासाठी जेमिमाह रॉड्रिग्स हीने सर्वाधिक धावा केल्या. जेमिमाहने 42 बॉलमध्ये 1 फोरसह 23 रन्स केल्या. हर्लिन देओल हीने 19 तर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 17 धावांचं योगदान दिलं. तर रिचा घोष 14 धावा करुन माघारी परतली. तर प्रिया पुनिया आणि स्मृती मानधना या सलामी जोडीने निराशा केली. प्रियाने 3 आणि स्मृतीने 8 धावा केल्या. सायमा ठाकोरने 4 तर दीप्ती शर्माने 1 धावा जोडली. तर डेब्यूटंट तितास साधू हीने 2 धावा केल्या.
मेगन शूट हीने 6.2 ओव्हरपैकी 1 ओव्हर मेडन टाकली. तर 19 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. तर किम गर्थ, ॲशले गार्डनर, ॲनाबेल सदरलँड आणि अलाना किंग या चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियासमोर 101 धावांचं आव्हान
Innings Break!#TeamIndia set a target of 101 🎯
Over to our bowlers 🙌
Live ▶️ https://t.co/RGxrsRZRGN#AUSvIND pic.twitter.com/x7m8Mvh6o0
— BCCI Women (@BCCIWomen) December 5, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, तीतास साधू, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर आणि रेणुका ठाकूर सिंग.
वूमन्स ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कॅप्टन), फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर,जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.