सांगलीकर स्मृती मंधाना हीने इतिहास घडवला आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना शतक खेळी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील हा सामना वाका ग्राउंड, पर्थ येथे खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलंय.स्मृतीने धावांचा पाठलाग करताना स्फोटक खेळी करत शतक केलं. स्मृतीने या शतकासह धमाका केला आहे.स्मृती या शतकासह एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी खास कामगिरी करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
स्मृतीने 103 बॉलमध्ये 97.09 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. स्मृतीने या शतकी खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे नववं शतक ठरलं. तसेच स्मृतीचं हे 2024 या वर्षातील चौथं शतक ठरलं. स्मृतीने यासह एका वर्षात 4 शतकं करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू हा बहुमान मिळवला. मात्र स्मृती शतकानंतर काही चेंडू खेळून आऊट झाली. स्मृतीने 109 बॉलमध्ये 105 धावा केल्या आणि बाद झाली.
स्मृतीने या शतकी खेळीसह टीम इंडियाची एक बाजू लावून धरत निर्णायक भागीदारी केली. स्मृती आणि रिचा घोष ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र रिचा 2 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृतीने हर्लिन देओल हीच्यासह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 102 धावा जोडल्या. त्यानंतर हर्लिन 39 धावांवर आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीतोबत तिसऱ्या विकेटसाठी 31 धावांची भर घातली. हरमन 12 धावांवर आऊट झाली. तर स्मृती शतक ठोकल्यानंतर आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाची 4 बाद 189 अशी स्थिती झाली.
स्मृती मंधानाचं नववं एकदिवसीय शतक
𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗!
Vice-captain Smriti Mandhana with her 9th ODI TON! 🙌
Superb knock from the #TeamIndia vice-captain! 👏👏
LIVE ▶️ https://t.co/pdEbkwGszg#AUSvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/XnxJOqxDBw
— BCCI Women (@BCCIWomen) December 11, 2024
वूमन्स ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.
वुमन इंडिया प्लेइंग इलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी आणि तितास साधू.