WBAN vs WIND : बांगलादेशचा 5-0 ने सुपडा साफ, टीम इंडियाचा 21 धावांनी विजय
Bangladesh Women vs India Women 5th T20I : वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशला त्यांच्याच घरात विजयी पंच देत क्लिन स्वीप केलं आहे. टीम इंडियाने 5 सामन्यांची मालिका 5-0 अशा फरकाने जिंकली आहे.
टीम इंडिया वूमन्स क्रिकेट टीमने आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात बांगलादेशचा टी 20 मालिकेत 5-0 ने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह बांगलादेशला क्लिन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर बांगलादेशला 135 धावाच करता आल्या. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 135 धावा केल्या.
बांगलादेशकडून रितू मोनी हीने सर्वाधिक 37 धावांचं योगदान दिलं. रुबिया हैदरने 20 धावा जोडल्या. शोभना मोस्त्रीने 13 धावा जोडल्या. दिलारा अक्टर 4, कॅप्टन निगारा सुल्ताना 7 आणि शोरना अक्टरने 1 धाव केली. तर शोरिफा खातून आणि राबिया खान ही जोडी नाबाद परतली. या दोघींनी अखेरीस बांगलादेशला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. शोरिफा खातून हीने नाबाद 28 धावा केल्या. तर राबिया खान 14 धावांवर नाबाद परतली. टीम इंडियाकडून राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आशा शोभना हीने 2 विकेट्स घेत राधाला चांगली साथ दिली. तर तितास साधू 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरली.
टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. टीम इंडियाकडून दयालन हेमलथा हीने सर्वाधिक 37 धावांचं योगदान दिलं. स्मृती मंधाना हीने 33 धावा जोडल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने 30 रन्स केल्या. ओपनर शफाली वर्मा 14 धावांवर बाद झाली. एस संजनाने 1 धाव जोडली. तर रिचा घोष आणि दीप्ती शर्मा ही जोडी नाबाद परतली. दीप्तीने 5 आणि रिचाने 28 धावा जोडल्या. बांगलादेशकडून राबिया खान आणि नाहिदा अक्टर या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर सुल्ताना खातून हीला 1 विकेट मिळाली.
टीम इंडियाचा विजयी ‘पंच’
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎! 🙌
Congratulations to #TeamIndia on winning the #BANvIND T20I series 5⃣-0⃣👏👏 pic.twitter.com/YTnEYKuOpm
— BCCI Women (@BCCIWomen) May 9, 2024
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन : निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटीपर), दिलारा अक्टर, रुबिया हैदर, शोभना मोस्तरी, शोर्ना अक्टर, रितू मोनी, शोरिफा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, सुलताना खातून आणि फरीहा त्रिस्ना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, दयालन हेमलता, ऋचा घोष (विकेटकीपर), एस सजना, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, आशा शोभना, तीतस साधू आणि राधा यादव.