EC vs IC: बर्थडे बॉय हरभजनचा विजयी सिक्सर, इंडियाची इंग्लंडवर 3 विकट्सने मात

World Championship of Legends 2024: इंग्लंड चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं.

EC vs IC: बर्थडे बॉय हरभजनचा विजयी सिक्सर, इंडियाची इंग्लंडवर 3 विकट्सने मात
wcl Harbhajan singh teamImage Credit source: WCL India Champions
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 8:48 PM

इंडिया चॅम्पियन्स टीमने वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. इंडियाने इंग्लंडवर सलामीच्या सामन्यात 3 विकेट्सने मात केली आहे. इंग्लंड चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. इंडियाने हे आव्हान 6 चेंडू शेष राखून 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाला विजयासाठी 6 धावांची गरज असताना बर्थडे बॉय हरभजन सिंग याने सिक्स ठोकला. हरभजनने यासह टीम इंडियाला विजयाच्या रुपात बर्थडे गिफ्ट दिलं. तर इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियासाठी ओपनर रॉबिन उथप्पा याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली.

इंडिया चॅम्पियन्सकडून रॉबिन उथप्पाने 32 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्ससह 50 धावा केल्या. गुरुकिरत सिंह मान याने 33 धावांचं योगदान दिलं. नमन ओझाने 25 धावा जोडल्या. सुरेश रैना 16 रन्स करुन आऊट झाला. कॅप्टन युवराज सिंहकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र युवराजला 2 धावाच करता आल्या. इरफान पठाणने 22 रन्स जोडल्या. आर विनय कुमार आला तसाच झिरोवर गेला. तर युसूफ पठाण आणि हरभजन सिंह या जोडीने विजयापर्यंत पोहचवलं. यूसुफने 5 आणि हरभजनने 6 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस स्कोफिल्ड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर रवी बोपाराच्या खात्यात 2 विकेट्स गेल्या.

इंग्लंडची बॅटिंग

इंग्लंड चॅम्पियन्स टॉस जिंकला. कॅप्टन केविन पीटरसन याने बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. इंग्लंडसाठी इयन बेन याने सर्वाधिक नाबाद 59 धावांची खेळी केली. समित पटेल याने 51 धावांचं योगदान दिलं. ओवेस शाह 23 धावांवर नाबाद परतला. तर फिल मस्टर्ड याने 13 आणि रवी बोपाराने 10 धावांचं योगदान दिलं. इंडिया चॅम्पियन्सकडून बर्थडे बॉय हरभजन सिंह याने 2 विकेट्स घेतल्या. तर धवल कुलकर्णी आणि आर विनय कुमार या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

हरभजन सिंहचा मॅचविनिंग सिक्स

इंग्लंड चॅम्पियन्स : केविन पीटरसन (कॅप्टन), इयान बेल, केविन ओ ब्रायन, फिल मस्टर्ड (विकेटकीपर), रवी बोपारा, समित पटेल, ओवेस शाह, रायन जे साइडबॉटम, अजमल शहजाद, ख्रिस स्कोफिल्ड, डॅरेन मॅडी आणि स्टुअर्ट मीकर.

इंडिया चॅम्पियन्स : युवराज सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, नमन ओझा (विकेटकीपर), सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय कुमार आणि गुरकीरत सिंग मान.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.