WCL Final: शोएब मलिकची 41 धावांची खेळी, इंडियासमोर 157चं टार्गेट, कोण जिंकणार?
Pakistan Champions vs India Champions Final 1st Innings: महामुकाबल्यात भारतीय गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत पाकिस्तानला 160 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं.
वर्ल्ड चॅम्पियनशी ऑफ लिजेंड्स 2024 फायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला विजयााठी 157 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्ताने 20 ओव्हरमध्ये 6 विके्टस गमावून 156 धावा केल्या. पाकिस्तानसाठी शोएब मलिक याने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या बहुतांश फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करण्यापासून भारतीय दिग्गज गोलंदाजांनी रोखलं. भारतीय गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर आता फलंदाज कशाप्रकारे या धावांचा पाठलाग करतात, याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. पाकिस्तानच्या बहुतांश फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना दिग्गज भारतीय गोलंदाजांसमोर मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानसाठी शोएब मलिक याने 36 बॉलमध्ये 41 रन्स केल्या. कामरान अकमलने 24 धावांचं योगदान दिलं. मकसूद 21 रन्स करुन मैदानाबाहेर परतला. मिस्बाह उल हक 18 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. शर्जील खान याने 12 धावा जोडल्या.तर इतर दोघांनी 7-7 धावा केल्या. तर सोहेल तन्वीर याने 9 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 19 रन्स केल्या. तसेच शाहिद अफ्रिदी 4 धावांवर नाबाद परतला. इंडियाकडून अनुरीत याने 3 विकेट्स घेतल्या. तर आर विनय कुमार, नेगी आणि इरफान पठाण या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
फायनलमध्ये कोण मारणार मैदान?
Who will win the Final of World Championship of Legends 2024 ?
India Champions 🇮🇳 Pakistan Champions 🇵🇰#IndvsPakWCL2024 pic.twitter.com/RNSLy1DLMq
— Richard Kettleborough (@RichKettle07) July 13, 2024
पाकिस्तान चॅम्पियन प्लेइंग ईलेव्हन: युनूस खान (कॅप्टन), कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, मिसबाह-उल-हक, आमेर यामीन, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ आणि सोहेल खान.
इंडिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युवराज सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), अंबाती रायुडू, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग, राहुल शुक्ला आणि अनुरीत सिंग.